शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:32 IST

Diva Railway Station: ठाण्यातील दिवा रेल्वे स्थानकावर महिलेवर जबरदस्ती करण्याच प्रयत्न झाला. परंतु, महिलेने विरोध करताच तिला मालगाडीसमोर ढकलण्यात आले.

ठाण्यातील दिवारेल्वे स्थानकावर शुक्रवारी पहाटे एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, महिलेने विरोध करताच तिला धावत्या मालगाडीसमोर ढकलण्यात आले. याप्रकरणी ठाणेरेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता पुढील चौकशीसाठी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेले नाही. याप्रकरणी रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 राजन सिंग (वय, ३९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पाच ते साडेपाच वाजताच्या सुमारास दिवा रेल्वे स्थानकावर रेल्वे सफाई कर्मचारी तुलसीदास हेमा कामदी (वय, ३५) काम करत असताना त्यांना ५/६ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून मोठा आवाज ऐकू आला. तुलसीदासने आपल्या एका सहकाऱ्याला याची माहिती दिली. या दोघांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना संबंधित आरोपी एका महिलेशी वाद घातलाना दिसला. 

याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना राजन प्लॅटफॉर्म मृत महिलेचा पाठलाग करताना आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताना दिसला. परंतु, मृत महिलेने विरोध करते. मात्र, त्यामुळे आरोपीला राग अनावर होतो आणि तो महिलेला धावत्या मालगाडीसमोर ढकलून देतो. फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिले.

घटनेनंतर राजन रेल्वे ट्रॅकवरून चालत असताना दिवा रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल सागर शिंदे यांनी  पकडून ताब्यात घेतले. ठाणे रेल्वे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली राजन सिंगविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले त्याला २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी माहिती दिली आहे की, आरोपी आणि मृत महिला एकमेकांना ओळखत नव्हते. ही महिला कोण आहे, कुठे राहते? हे अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रthaneठाणेdivaदिवाrailwayरेल्वेMumbai Localमुंबई लोकल