ठाणे : इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला फ्लार्इंग किस देणार्या एका युवकाचा खटला सात वर्षे चालला. हा खटलाच एक प्रकारची शिक्षा गृहित धरून त्याला आणखी तुरूंगवासाची शिक्षा न सुनावण्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत, न्यायालयाने त्याला पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.२८ जून २0१0 रोजी ही घटना घडली होती. याच भागातील ब्राम्हण विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकणारी पीडित विद्यार्थिनी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास मैत्रिणीसोबत घराकडे पायी जात असताना वर्तकनगरातील महापालिकेच्या रूग्णालयाजवळ चार उनाड मुले उभी होती. त्यापैकी एकाने पीडित विद्यार्थिनीचा पाठलाग केला. थोडे अंतर कापल्यानंतर मुलीने मागे वळून पाहिले असता, लाल रंगाचे शर्ट घातलेल्या आरोपीने तिला ‘फ्लार्इंग किस’ दिला. यामुळे भेदरलेल्या मुलीने घरी जाऊन वडिलांना हा प्रकार सांगितला. वडिलांनी लगेच वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अभिजीत भुजबळ यांनी आरोपी मंदार अरूण जगताप याला अटक करून या प्रकरणाचा तपास केला. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आर.टी. इंगळे यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. घटनेच्या वेळी पीडित विद्यार्थिनीसोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीसह तीन साक्षीदार सरकार पक्षाने तपासले. तिन्ही साक्षीदार शेवटपर्यंत त्यांच्या जबाबावर कायम राहिले.घटनेच्या वेळी आरोपी २१ वर्षांचा होता. या वयात अशा चुका होत असतात. याशिवाय सात वर्षे आरोपी खटल्याला सामोरा गेला. ही एक प्रकारची शिक्षाच आहे. आणखी तुरूंगवासाची शिक्षा सुनावल्यास तो अट्टल गुन्हेगार होईल, अशी भिती व्यक्त करून बचाव पक्षाने आरोपीला आर्थिक दंडाची सुनावण्याची विनंती केली. तपास अधिकाºयाने निर्विवादपणे गुन्हा सिद्ध केल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदवून, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे शनिवार, १६ डिसेंबर रोजी आरोपीस पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
ठाण्यातील अल्पवयीन विद्यार्थिनीला दिलेला फ्लार्इंग किस पडला पाच हजार रुपयांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 17:59 IST
ठाण्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढणार्या आरोपीला न्यायालयाने शनिवारी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सात वर्षे खटला चालल्यानंतर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
ठाण्यातील अल्पवयीन विद्यार्थिनीला दिलेला फ्लार्इंग किस पडला पाच हजार रुपयांना
ठळक मुद्दे२0१0 साली केली होती छेडखानीसात वर्षे चालला खटलासर्व साक्षीदार जबाबावर कायम