४० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाला ठाण्यातील लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 01:53 PM2021-09-01T13:53:12+5:302021-09-01T13:53:36+5:30

महासभेत घटनेचा निषेध व्यक्त, महासभा केली पूर्णवेळ तहकुब. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महत्वाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेच्या वतीने हा निर्णय जाहीर करण्यात आला होता.

Thane corporators also support the strike of 40,000 officers and employees | ४० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाला ठाण्यातील लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा

४० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाला ठाण्यातील लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे  महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर अधिकारी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. अतिशय वाईट पद्धतीने हा हल्ला पिंपळे यांच्यावर करण्यात आला असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी एमएमआर रिजनमधील सर्व महापालिका आणि नगर पालिकांमधील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी एक दिवस काम बंद अंदोलन केले. ठाण्यातील लोकप्रतिनिधींनी देखील बुधवारी झालेल्या महासभेत या आंदोलनाला पाठींबा देत पूर्णवेळ महासभा तहकुब केली.

         मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महत्वाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेच्या वतीने हा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी एमएमआर रिजन मधील महापालिका आणि नगरपालिकांमधील अधिकारी आणि कर्मचा:यांची संख्या ४० हजारांच्या घरात असून यामुळे कामावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. मात्न या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात मानसिक खच्चीकरण झाले असल्याची भावना या अधिका:यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळेचे हे कामबंद आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

     दरम्यान बुधवारी झालेल्या महासभेत भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी या संदर्भात सभातहकुबी मांडली होती. सहाय्यक आयुक्तांवर झालेला हा हल्ला प्राणघातकी होता, त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करीत महासभा तहकुब करण्याची मागणी केली. त्याला शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के यांनी अनुमोदन दिले. तर महापौर नरेश म्हस्के यांनी या घटनेचा निषेध करीत बुधवारी एमएमआर रिझनमध्ये सर्वानीच काम बंद आंदोलन केले असल्याचे सांगितले. त्यानुसार ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी देखील काम बंद ठेवले आहे. तसेच त्यांच्या संघटनेकडून देखील मला निवेदन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सभागृहात चर्चा करण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाला पाठींबा देत ही महासभा पूर्णवेळ तहकुब करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Thane corporators also support the strike of 40,000 officers and employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.