Thane Corona Update: ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ ताासंत ३५० नवे कोरोना रुग्ण आढळले, तर आठ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 20:41 IST2021-07-31T20:38:56+5:302021-07-31T20:41:21+5:30
ठाणे : जिल्ह्यातील महापालिकां, गावपातळीवर ३५० कोरोना रुग्णांची वाढ झाली असून आठ जणांचा मृत्यू शनिवारी झाला आहे.

Thane Corona Update: ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ ताासंत ३५० नवे कोरोना रुग्ण आढळले, तर आठ जणांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील महापालिकां, गावपातळीवर ३५० कोरोना रुग्णांची वाढ झाली असून आठ जणांचा मृत्यू शनिवारी झाला आहे.
ठाणे शहरात ५६ रुग्णांच्या वाढीसह एकही मृत्यू नाही. कल्याण डोंबिवलीला ८७ रुग्ण वाढीसह एक मृत्यू झाला आहे. उल्हासनगरमध्ये नऊ रुग्ण वाढ झाली असून तीन मृत्यू झालेत. भिवंडी परिसरात एकही रुग्ण आणि मृत्यू नाही. मीरा भाईंदरला ६४ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू झाला नाही. अंबरनाला १८ रुग्ण वाढले असून एक मृत्यू झाला आहे. बदलापूरमध्ये १२ रुग्णांची आज वाढ झाली. तर जिल्ह्यातील गांवपाड्यात ३६ रुग्ण सापडले असून एकाही मृत्यूची नोंद नाही.