शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अमृत शहरांत ठाणे सर्वोत्तम; केडीएमसी, भिवंडीला ठेंगा; पर्यावरण संवर्धनात सर्वोत्कृष्ट कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 08:57 IST

environmental conservation : या स्पर्धेत ४३ शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यांमधील अमृत शहरांच्या गटामध्ये ठाणे महापालिकेला ‘सर्वोत्तम कामगिरी करणारे शहर’ म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला.

ठाणे : माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून २०२०-२१ मध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित घेतलेल्या स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेने प्रथम स्थान पटकाविले. महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ऑनलाइनद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

या स्पर्धेत ४३ शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यांमधील अमृत शहरांच्या गटामध्ये ठाणे महापालिकेला ‘सर्वोत्तम कामगिरी करणारे शहर’ म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमास महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त २ संजय हेरवाडे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, उपनगर अभियंता अर्जुन अहिरे, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड उपस्थित होते.

५ जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शनिवारी या पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, माझी वसुंधरा अभियान संचालनालयाने केली. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैस्कर व महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदा व महानगरपालिका सहभागी झाल्या होत्या.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत अमृत शहरे, नगरपालिका, नगर परिषदा व नगरपंचायत अशा एकूण ६८६ संस्थांमध्ये स्पर्धा झाली. भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांमध्ये १ जानेवारी २०२० ते १५ एप्रिल २०२१ या कालावधीमध्ये केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यात आले. वृक्षलागवड, जलसंवर्धन, हवाप्रदूषण नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जाबचत व पर्यावरणाबाबत जनजागृती याबाबतच्या कामांचे मूल्यमापन करून ते ध्वनिचित्रफितीद्वारे शासनाला सादर केले होते. यामध्ये ठाणे महानगरपालिकेची सर्वोत्तम १० शहरांमध्ये निवड झाली होती. पुन्हा शासनाने ऑनलाईनद्वारे महापालिकेने केलेल्या कामांचे मूल्यांकन केले. 

नवी मुंबई द्वितीय, मुंबई महापालिका तृतीय 

ठाणे महापालिकेची कामगिरी अव्वल ठरली व अमृत सिटी म्हणून ठाणे महापालिकेस प्रथम पारितोषिक प्राप्त झाले; तर द्वितीय क्रमांक नवी मुंबई महानगरपालिका, तृतीय क्रमांक बृहन्मुंबई महानगरपालिकेस देण्यात आला. प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक पुणे महापालिकेला, द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक विभागून बार्शी व नाशिक महानगरपालिकेस देण्यात आले. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान व त्यांच्या संपूर्ण टीमचे महापौर व आयुक्तांनी अभिनंदन केले.

टॅग्स :thaneठाणे