शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याचा बिहार होतोय का?; माणुसकीला काळिमा फासणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 23:38 IST

माणुसकीला काळिमा फासणारी घटना : सामाजिक संघटनांच्या महिलांचे मत

ठाणे : कर्जाचा हप्ता थकविल्याने पत्नीला उचलून नेण्याची धमकी एका खासगी वित्तीय कंपनीच्या प्रतिनिधीने दिली. यावरून ठाण्यातील विविध संघटनांच्या महिलांमधून निषेधाचा सूर व्यक्त होत आहे. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात घडलेली ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, ठाण्याचे बिहार होत आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच अशी धमकी देणाऱ्यावर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.

दहा लाखांच्या व्यावसायिक कर्जाचा हप्ता थकविल्यामुळे व्यावसायिकाच्या पत्नीला उचलून नेण्याची धमकी मॅन्टिफी फायनान्स कंपनीच्या राज शुक्ला या प्रतिनिधीने दिली होती. यावरून पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित होत आहे. ही घटना दखलपात्र गुन्ह्याची असल्याने पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून त्या प्रतिनिधीला अटक करण्याची मागणी समस्थ महिलावर्गाकडून होत आहे. ही अत्यंत असंस्कृत आणि असभ्यपणाची लक्षणे आहे. महाराष्ट्राने स्त्रियांचा नेहमीच आदर केला आहे आणि अशी घटना महाराष्ट्रात घडत असतील तर त्या घटनेची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे. 

पत्नीला उचलून नेऊ असे बोलणे हा मोठा गुन्हा आहे. मुळात आजची परिस्थिती पाहता कर्जाचा हप्ता भरण्याचा तगादा ती वित्तीय कंपनी लावू शकत नाही, तसे आदेशही आहेत. पत्नीला उचलून नेऊ असे म्हणणाऱ्याला अटक झालीच पाहिजे. ही तर माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. आपण कोणत्या काळात आहोत ?     - वंदना शिंदे,  सदस्य, भारतीय महिला फेडरेशन

अशी धमकी देणे यावरून महाराष्ट्र मागे जातोय का? असा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्र हे सुसंकृत राज्य आहे. चांगल्या गोष्टींची प्रथा महाराष्ट्राने पाडली आहे. आता महाराष्ट्राचा बिहार होतोय का? असे वाटत आहे. जर असे कुणी बोलू शकते तर त्यांची मानसिकता तशीच आहे. अशा लोकांवर कोणाचाही वचक किंवा धाक राहिलेला नाहीये. - सुमीता दिघे, सामाजिक कार्यकर्त्या

आताच्या काळात अशी दिली जाणारी धमकी ऐकल्यावर विचित्र वाटत आहे. जुलूमशाही परत आली की काय असे वाटत आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे.- यामिनी पानगावकर, लेखिका

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र