Thane: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 21:45 IST2023-03-28T21:44:53+5:302023-03-28T21:45:38+5:30

Thane: एका अल्पवयनी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाºया दक्ष उर्फ डॅनियल सुज्ञान आव्हाड (२०) या आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास तसेच सहा हजार रुपये दंडाची  शिक्षा ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीक्ष व्ही. व्ही. वीरकर यांनी सुनावली.

Thane: Accused of sexually assaulting minor girl sentenced to seven years rigorous imprisonment | Thane: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Thane: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

ठाणे - एका अल्पवयनी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाºया दक्ष उर्फ डॅनियल सुज्ञान आव्हाड (२०) या आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास तसेच सहा हजार रुपये दंडाची  शिक्षा ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीक्ष व्ही. व्ही. वीरकर यांनी सुनावली. दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार आहे.

नवी मुंबईतील वाशी परिसरात ही १४ वर्षीय मुलगी १९ जुलै २०१८ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास तिचा मित्र दक्ष याच्यासमवेत गार्डनमध्ये फिरायला नेले. त्यानंतर त्याने तिला फूस लावून पळवून नेले. तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक  नितीन राठोड यांच्या पथकाने आरोपी दक्षला अटक केली होती.

याच खटल्याची सुनावणी २८ मार्च २०२३ रोजी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात झाली. यावेही नऊ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी आरोपीच्या विरुद्ध पुरावे सादर करुन पिडितेची जोरदार बाजू मांडली. सर्व बाजू पडताळल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यावेळी पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक जयवंत जगताप आणि हवालदार लहाने यांनी काम पाहिले.

Web Title: Thane: Accused of sexually assaulting minor girl sentenced to seven years rigorous imprisonment