Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ५० माजी नगरसेवक करणार शक्तीप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 16:03 IST2022-06-22T16:02:35+5:302022-06-22T16:03:11+5:30
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ किंबहुना हिंदुत्वाच्या मुद्यावर ठाण्यातील शिवसेनेचे तब्बल ५० हून अधिक नगरसेवक शक्ती प्रदर्शन करणार आहेत.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ५० माजी नगरसेवक करणार शक्तीप्रदर्शन
ठाणे:
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ किंबहुना हिंदुत्वाच्या मुद्यावर ठाण्यातील शिवसेनेचे तब्बल ५० हून अधिक नगरसेवक शक्ती प्रदर्शन करणार आहेत. येत्या दोन दिवसात हे शक्तीप्रदर्शन केले जाणार असल्याची माहिती शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांनी दिली. घोडबंदर, वागळे आणि कोपरी भागातील शिवसैनिक एकत्र येऊन आनंद मठावर हिंदुत्वाचा जागर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नाराजीवरुन तसेच वारंवार डाववले जात असल्याने शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडाचे हत्यार उपसले आहे. त्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यभर उमटू लागले आहेत. त्यातही शिवसेनेला पहिली सत्ता देणा:या ठाण्याने देखील आता शिंदे यांच्या बाजूनेच झुकते माप दिले असल्याची माहिती समोर येत आहे. मागील ३० वर्षे महापालिकेवर शिंदे यांच्यामुळेच भगवा फडकत असल्याचे पदाधिकारी बोलत आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेली भुमिका योग्यच असल्याचे हे पदाधिकारी सांगत आहेत. त्यामुळेच शिंदे यांनी उचलेल्या पावलानंतर आता शिवसेनेतील ठाण्यातील माजी नगरसेवक देखील त्यांच्या बाजूने उठे ठाकले आहेत. आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे हिंदुत्व मानणारे सैनिक आहोत, असे सांगत आता शिंदे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरण्याची तयारी त्यांनी केली आहे.
ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७ नगरसेवक आहेत. त्यातील आता तब्बल ५० नगरसेवकांची जुळवाजुळव झाली आहे. तसेच या माजी नगरसेवकांनी इतर पदाधिका:यांना देखील आपलेसे करण्यासाठी पावले उचलली आहेत. तसेच शिंदे हे कसे बरोबर आहेत, हे देखील इतरांना सांगितले जात आहे. त्यानुसार आता येत्या दोन दिवसात शिंदे यांच्या समर्थनार्थ हे सैनिक रस्त्यावर उतरुन शक्ती प्रदर्शन करणार आहेत. यामध्ये वागळे इस्टेट मधील सर्वच माजी नगरसेवक पदाधिकारी, घोडबंदर आणि कोपरी भागातील नगरसेवकांनी त्याची तयारी केली आहे. शिंदे हेच आमचे दैवत असल्याने त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्यच असल्याचेही माजी नगरसेवक सांगत आहेत. त्यानुसार आता हे शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. त्यातही हे शक्ती प्रदर्शन हे आनंद मठाजवळ केले जाणार असल्याने त्यात आता किती सैनिक सहभागी होतात हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे.