शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

ठाणे १४ ठिकाणी तुंबण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 1:04 AM

पावसाळ्यासाठी पालिका सज्ज; २६ ठिकाणे आहेत दरडप्रवण

ठाणे : एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे ठाणे महापालिका येणाऱ्या मान्सूनचा सामना करण्यासाठी तयारी करत आहे. त्यानुसार, पावसाळ्यात पाणी तुंबणाºया १४ संभाव्य ठिकाणांची यादी तयार केली आहे. तसेच दरड कोसळू शकणाºया २६ ठिकाणांची दुसरी यादीही पालिकेने जाहीर केली आहे.महापालिकेने केलेल्या सर्व्हेत १४ ठिकाणे अशी आढळली आहेत, जिथे यंदाच्या पावसाळ्यात पाणी साठू शकणार आहे. काही वर्षांपूर्वी हा आकडा २६ च्या घरात होता. परंतु, पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे तो कमी झाला आहे. त्यानुसार, शहरातील राममारु ती रोड, गोखले रोड, राम गणेश गडकरी रंगायतन, सॅटीस पुलाखाली, मासुंदा तलाव, वंदना टॉकीज, देवनायर सोसायटी, गजानन महाराज चौक, देवधर रु ग्णालय, जिजामाता मार्केट, पम्पिंग स्टेशन, चव्हाण चाळ, वृंदावन आणि श्रीरंग सोसायटी, पंचामृत, आयसीआयसीआय बँक, घोडबंदर रोड, विटावा सबवे आणि दिवागाव परिसरात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. तर, प्रभाग समितीनिहाय ठिकाणांमध्ये नौपाडा- ८, उथळसर- २, माजिवडा-मानपाडा- २, कळवा- १, मुंब्रा- १ आदींचा समावेश आहे.दुसरीकडे पालिका हद्दीत २६ ठिकाणांवर पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका आहे. महत्त्वाचे म्हणजे याबाबत महापालिका प्रशासनाने तेथे राहणाºया नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत. परंतु, तरीही येथे रहिवासी आजही वास्तव्य करताना दिसत आहेत. समितीनिहाय दरड कोसळणाºया ठिकाणांमध्ये रायलादेवी- १२, माजिवडा-मानपाडा- २, कळवा- ६, मुंब्रा- ५ आणि वर्तकनगर- १ अशा भागांचा समावेश आहे. यामध्ये संतोषनगर, पाटीलनगर, डक्टलाइन, रेल्वेवसाहत, सेंट उलाई शाळा, हनुमाननगर, शंकर मंदिर, इंदिरानगर टेकडी, रूपादेवी, भास्करनगर, पौंडपाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, वाघोबानगर, गावदेवी मंदिर (मुंब्रा), केणीनगर, कैलासनगर, आझादनगर, सैनिकनगर, डोंगरीपाडा, पातलीपाडा, कशेळीपाडा, गुरुदेव आश्रम व उपवन आदी ठिकाणांचा समावेश आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका