Thane: १२ भारतीय जलतरणपटू श्रीलंकेतील 'रामसेतू' मोहिमेसाठी सज्ज

By प्रज्ञा म्हात्रे | Published: April 30, 2024 01:42 PM2024-04-30T13:42:28+5:302024-04-30T13:48:26+5:30

Thane News: रामसेतू मोहीम अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून ठाण्यातील तरुण जलतरणपटू (१० ते १८ वर्षे वयोगटातील) ३ आणि ४ मे २०२४ रोजी 'रामसेतू' तलाईमन्नार (श्रीलंका) आणि धनुष्कोडी (भारत) हे २१ किलोमीटरचे अंतर रिले पद्धतीने पोहून पार करणार आहेत.

Thane: 12 Indian swimmers ready for 'Ramsethu' expedition in Sri Lanka | Thane: १२ भारतीय जलतरणपटू श्रीलंकेतील 'रामसेतू' मोहिमेसाठी सज्ज

Thane: १२ भारतीय जलतरणपटू श्रीलंकेतील 'रामसेतू' मोहिमेसाठी सज्ज

- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - रामसेतू मोहीम अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून ठाण्यातील तरुण जलतरणपटू (१० ते १८ वर्षे वयोगटातील) ३ आणि ४ मे २०२४ रोजी 'रामसेतू' तलाईमन्नार (श्रीलंका) आणि धनुष्कोडी (भारत) हे २१ किलोमीटरचे अंतर रिले पद्धतीने पोहून पार करणार आहेत.

अयोध्येतील भगवान रामाला त्यांच्या कर्मस्थानी मानवंदना देण्यासाठी आणि नव्याने बांधलेल्या राममंदिराची प्रतिष्ठा वर्धिष्णू करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम ठाण्यातील पहिली आंतरराष्ट्रीय जलतरण मोहीम आहे, ज्यामध्ये अर्णव पाटील, अभीर साळसकर, स्वरा हंजनकर, वंशिका अय्यर, रुद्र शिराळी, शार्दुल सोनटक्के, अथर्व पवार, अपूर्व पवार, साविओला मस्कारेन्हस, स्वरा सावंत, लौकिक पेडणेकर, मीत गुप्ते असे १२ तरुण जलतरणपटू 'पाल्क स्ट्रेट' ओलांडण्यासाठी सज्ज झाले आहेत.

या जलतरणपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विनय सहस्रबुद्धेजी, मृणाल पेंडसे, विकास घांग्रेकर, अश्विनी बापट, वरदराज बापट, अमोल फडके, क्षमा पातकर, मंगेश ओक, रामचंद्र चिवकुल याच बरोबर मुख्य प्रशिक्षक नरेंद्र पवार, प्रशिक्षक भारती सावंत तसेच प्रोजेक्ट इन्चार्ज माजी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आरती प्रधान (अर्जुन पुरस्कार व शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या) व अनेक मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Thane: 12 Indian swimmers ready for 'Ramsethu' expedition in Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.