शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या मार्गात ठामपाच्या जलवाहिनीचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:43 IST

२७ कोटींचा खर्च अपेक्षित : काम पूर्ण होण्यास लागणार ३ वर्षे; कोंडीत पडणार भर

अजित मांडके ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वडाळा ते कासारवडवली या मेट्रोच्या कामामुळे सध्या ठाण्याच्या विविध भागांत वाहतूककोंडी होत आहे. परंतु, आता येत्या काही दिवसांत तीत आणखी भर पडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, तिच्या मार्गात ठाणे महापालिकेच्या जवळजवळ अडीच किमीपर्यंतची जलवाहिनी आड आली आहे. त्यामुळे ती आता स्थंलातरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.सध्या ज्या ठिकाणी मेट्रोचे बॅरिकेड्स लावले आहेत, त्याच माजिवडा ते थेट लुईसवाडीपर्यंत ही जलवाहिनी येत असल्याने ती स्थलांतरित करावी लागणार आहे. यामुळे या भागात वाहतूककोंडीत आणखी भर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सध्या ठाणे ते घोडबंदर-कासारवडवली या मार्गावर मेट्रोच्या मातीपरीक्षणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. यामुळे घोडबंदर भागात तर वाहतूककोंडी होत आहे. आता तीनहातनाका, नितीन कंपनी, माजिवडानाका या भागातही या बॅरिकेड्समुळे वाहतूककोंडी होत आहे. साधारणपणे तीन वर्षे हे काम पूर्ण करण्यासाठी जाणार आहेत. परंतु, आतापासूनच वाहतूककोंडी होऊ लागल्याने त्यावर पर्यायी मार्गांचा विचार सुरू आहे.दरम्यान, ही जलवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी एमएमआरडीएने महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार, ती स्थलांतरित करण्यासाठी पालिकेने परवानगी दिली आहे. परंतु, त्यासाठी होणारा खर्च हा एमएमआरडीएने करावा, अशी मागणी पालिकेने केली आहे. ती माजिवडा ते लुईसवाडी अशी अडीच किमीपर्यंतची असून ती अनेक वर्षे जुनी आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ११०० मिमी व्यासाची, त्यानंतर ९०० मिमी आणि पुढे ७५० मिमी व्यासाची अशी ही जलवाहिनी आहे.१३०० मिमी व्यासाची वाहिनी टाकणारही जलवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी सुमारे २७ कोटींचा खर्च अपेक्षित असून ती लुईसवाडीकडून पुढे जाणाऱ्या डाव्या बाजूकडील सर्व्हिस रोडच्या खालून टाकली जाणार आहे. परंतु, ती टाकताना भविष्याचा विचार करून १३०० मिमी व्यासाची वाहिनी टाकण्याची मागणीसुद्धा पालिकेने केली आहे. यासाठी अर्धा खर्च तरी पालिकेने उचलावा, अशी मागणी एमएमआरडीएने पालिकेला केली आहे. त्यानुसार, आता पालिकेच्या पातळीवर विचार सुरूझाला आहे. येत्या काही दिवसांत यावर तोडगा काढून काम सुरू होईल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

टॅग्स :Metroमेट्रो