गुजरात घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेच्या महिलांकडून थाळीनाद आंदोलन
By नितीन पंडित | Updated: August 27, 2022 21:10 IST2022-08-27T21:09:04+5:302022-08-27T21:10:33+5:30
शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या आंदोलनाची सांगता करण्यात आली.

गुजरात घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेच्या महिलांकडून थाळीनाद आंदोलन
भिवंडी - गुजरात बलात्कार प्रकरणातील आरोपीना गुजरात सरकारने दोषमुक्त केल्यानंतर या बलात्कारी आरोपींचा सन्मान करण्यात आला. याचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभर उमटत असतानाच शनिवारी भिवंडीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या भिवंडी शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली थाळी नाद आंदोलन करीत या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे शराध्यक्ष शोएब खान गुड्डू यांच्यासह राजेश चव्हाण, अनिल फडतरे,रसूल खान,गयासुद्दीन अन्सारी, रौफ खान मोतीवाला, वाजीद खान,इम्रान शेख,जकी अन्सारी, असिफ खान, सलीम मेमन यांसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सहभागी झाले होते.
शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या आंदोलनाची सांगता करण्यात आली.