शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

‘वेस्ट टू एनर्जी’साठी लागणार कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:45 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेला अद्याप कचराप्रश्न सोडवण्यात यश आलेले नाही.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेला अद्याप कचराप्रश्न सोडवण्यात यश आलेले नाही. आधारवाडी डम्पिंग बंद करण्याच्या बदल्यात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायी प्रकल्प सुरू करण्यात दिरंगाई झाली आहे. ओला-सुका कचºयाचे वर्गीकरण न करताच त्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचा विषय २० जुलैच्या महासभेत पटलावर ठेवण्यात आला आहे. त्यासाठी दोन पर्याय सुचविले आहेत. महापालिकेने त्यासाठी कंत्राटदाराला अर्थसाह्य करण्याचा एक पर्याय आहे. अन्यथा राज्य सरकारने केलेल्या सामंजस्य करारानुसार क्लस्टरमध्ये त्याचा समावेश होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.महापालिकेने तीन प्रकल्पांसाठी निविदा काढली आहे. त्यात आधारवाडी डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद करणे, उंबर्डे व बारावे घनकचरा प्रकल्प विकसित करणे, त्यानंतर मांडा येथे भरावभूमी विकसित करणे प्रस्तावित आहे. आधारवाडी, बारावे, उंबर्डे यावर ६० कोटींचा खर्च होणार आहे. स्वच्छ भारत अभियानातून आलेल्या निधीतून हे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. मात्र, प्रकल्पांचे काम संथगतीने सुरू आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारने डेडलाइन दिली असून, ती पाळण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे.‘वेस्ट टू एनर्जी’ राबवण्यासाठी तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू यांनी प्राधान्य दिले होते. या प्रकल्पासाठी १० एकर जागा उंबर्डे येथे राखीव ठेवली आहे. इंडिया पॉवर व हिताची या कंपन्यांच्या जॉर्इंट व्हेंचर कंपनीची निविदा महापालिकेने स्वीकारली आहे. ही कंपनी हा प्रकल्प उभारणार आहे. त्यासाठी जवळपास २५६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. महापालिकेस एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. महापालिकेने केवळ जागा उपलब्ध करून द्यायची आहे. प्रकल्पात ५७० मेट्रीक टन कचºयावर प्रक्रिया केली जाणार आहे. प्रकल्पात तयार झालेली वीज कंत्राटदार कंपनी वीजनियामक आयोगाच्या मान्यतेनुसार दिलेल्या दराप्रमाणे विकणार आहे.कंपनीने महापालिकेस कचरा वाहून नेण्याचा प्रति टनाला ६९६ रुपये दर (टिपिंग फी) दिला आहे. मात्र, प्रकल्प २० वर्षांसाठी असल्याने पुढे त्यात दर वर्षाला तीन टक्के वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या वर्षाला १२ कोटी ७० लाख रुपयांचा कचरा वाहतुकीचा खर्च हा २० व्या वर्षी तीन टक्केवाढीनुसार ५० कोटी ३८ लाख रुपयांच्या घरात जाऊ शकतो, असे कंपनीने दिलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे. एकूण २० वर्षांपर्यंत ५४३ कोटी ४६ लाख रुपये टिपिंग फी पोटी द्यावे लागतील.वेस्ट टू एनर्जीच्या कंत्राटदाराने कचºयाची विल्हेवाट लावण्याची १०० टक्के हमी दिली आहे. तसेच त्यासाठी कचरा वर्गीकरणाची गरज भासरणार नाही.कंत्राटदारास महापालिकेने ५० कोटींपर्यंतचे अर्थसाह्य केल्यास हा प्रकल्प मार्गी लागू शकतो. त्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेच्या पटलावर आहे. तर, दुसरा प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पाविषयी असून, त्यासाठी राज्य सरकारने ‘सिटी आॅफ अ‍ॅमस्टरडॅम किंग्डम आॅफ नेदरलॅण्डशी’ सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका आणि बदलापूर व अंबरनाथ पालिका यांच्यासाठी एकत्रित कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी क्लस्टर योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेत वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प समाविष्ट होऊ शकतो. मात्र दुसºया प्रकारातील प्रक्रिया ही वेळकाढू व दूरगामी आहे. या दोन्ही पर्यायांपैकी महासभा कोणत्या पर्यायावर शिक्तामोर्तब करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.>टिपिंग फी ठरणार कळीचा मुद्दायापूर्वी आघाडी सरकारच्या काळात तळोजा येथे एमएमआरडीएने सामाईक भरावभूमीचा प्रकल्प तयार केला होता. मात्र, त्यात केडीएमसी समाविष्ट झाली नव्हती. टिपिंग फीला महापालिकेचा विरोध होता. कचरा मोफत वाहून नेला जावा, असा महापलिकेचा आग्रह होता. पुढे हा प्रकल्पही बारगळला. आता पुन्हा टिपिंग फीच्या मुद्यावरच या प्रकल्पाचे घोडे अडू शकते, असे जाणकारांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका