शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

सभ्यतेच्या बुरख्यातील ‘दहशती’ डॉक्टर; दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप; एटीएसच्या कारवाईनंतर बदलापूर शहर रडारावर

By पंकज पाटील | Updated: August 7, 2025 13:13 IST

उत्तर प्रदेशच्या एटीएसने कारवाई करून या डॉक्टराला ताब्यात घेतल्यामुळे बदलापूर शहर चर्चेत आले आहे.

पंकज पाटील

बदलापूर : रुग्णालयातील चांगली वागणूक... रुग्णांसोबत सेवाभावी वृत्ती... उच्चशिक्षण घेऊन अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न बाळगणारा बदलापूरचाडॉक्टर दहशतवादी संघटनेच्या संपर्कात कसा आला, याचा शोध आता सुरू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या एटीएसने कारवाई करून या डॉक्टराला ताब्यात घेतल्यामुळे बदलापूर शहर चर्चेत आले आहे.

बदलापूर शहरातून उत्तर प्रदेश एटीएसने डॉक्टर ओसामा शेख याला ताब्यात घेतले. शेख हा डॉक्टर पूर्वेकडील एका रुग्णालयात होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून कार्यरत होता. रुग्णालयातील त्याची वागणूक शांत आणि संयमी होती आणि रुग्णांप्रति त्याची आस्था विलक्षण होती. असे असले, तरी प्रत्यक्षात त्याची कृती हे उत्तर प्रदेश एटीएसला खटकली.

असा झाला डाॅक्टरचा सहभाग उघडउत्तर प्रदेश एटीएसकडून देशविघातक कृत्यांवर नजर ठेवली जात होती. यामध्ये ४०० सदस्य असलेल्या का पाकिस्तानी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये उत्तर प्रदेशातला एक मोबाइल नंबर समाविष्ट असल्याची माहिती मिळाली होती. हा नंबर वापरणाऱ्या अजमल अली याला उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपण पाकिस्तानी व्यक्तींच्या संपर्कात असल्याची कबुली दिली.  अजमल अली याने आपण इंस्टाग्रामवर एका व्यक्तीला आपला गुरू आणि मेंटॉर मानत असल्याचे त्याने सांगितले. अजमल अली याचा हा गुरू म्हणजेच बदलापूरचा डॉ.ओसामा शेख असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली.

ग्रामस्थ दहशतीखालीबदलापूर गावात राहणारा डॉ.ओसामा याला चार बहिणी असून, त्याच्यावर घराची जबाबदारी होती. तो दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची जाणीवही गावातील नागरिकांना नव्हती. तो ज्या बदलापूर गावात राहत होता, ते गावही धार्मिक वादामुळे नेहमी रडारवर राहिले आहे. त्यामुळे गावातील एका डॉक्टरावर कारवाई झाल्याने ग्रामस्थ दहशतीच्या छायेखाली आहेत.

देशविरोधी कारवायांना प्रोत्साहनाचा संशयओसामा हा अजमल अली याच्याप्रमाणे अनेकांशी इंस्टाग्राम आणि सिग्नल ॲपद्वारे संपर्कात राहून देशविरोधी कारवायांना प्रोत्साहन देत होता, असा संशय उत्तर प्रदेश एटीएसला असून, त्याच चौकशीसाठी त्याला अटक केली आहे. भारतातील सरकार पाडून शरिया कायदा लागू करण्याच्या चर्चाही केल्या जात होत्या, कट्टर धार्मिक विषयांवर हा डॉक्टर अप्रत्यक्ष सहभागी होत असल्याचा आरोपही होत आहे.

 

टॅग्स :badlapurबदलापूरTerrorismदहशतवादdoctorडॉक्टरAnti Terrorist Squadएटीएस