रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया लवकर सुरु, खासदारांनी घेतली आयुक्तांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 22:10 IST2021-06-08T22:10:11+5:302021-06-08T22:10:51+5:30

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली एमएमआरडीए आयुक्तांची भेट, अतिरिक्त आठव्या टप्प्याचेही नियोजन करण्याची मागणी

The tender process for the third phase of the ring road started early, MP shrikant shinde | रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया लवकर सुरु, खासदारांनी घेतली आयुक्तांची भेट

रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया लवकर सुरु, खासदारांनी घेतली आयुक्तांची भेट

ठळक मुद्देखासदार शिंदे यांनी नुकतीच रिंगरोडच्या दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यान सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यान रस्ते विकासाचे काम ६० टक्के पूर्ण झालेले आहे.

कल्याण-रिंग रोड या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या तिस:या टप्प्याच्या कामाची निविदा लवकर काढण्यात यावी अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्त व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे केली आहे. खासदार शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्तांची आज भेट घेतली. यावेळी त्यांनी ही मागणी केली.

खासदार शिंदे यांनी नुकतीच रिंगरोडच्या दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यान सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यान रस्ते विकासाचे काम ६० टक्के पूर्ण झालेले आहे. या कामातील काही अतिक्रमणो दूर करण्याचे काम सुरु आहे. उर्वरीत ४० टक्के कामही मार्गी लागून हा टप्पा डिसेंबर अखेर पूर्णत्वास येणार आहे. हे काम सुरु असताना तिस:या टप्प्याचे कामासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाची ८० टक्के प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तिस:या टप्प्यातील मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडीच्या कामासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात यावी. मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली खाडी पूलाचे कामही प्रगती पथावर आहे. त्यामुळे रिंग रोडच्या तिस:या टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्यासाठी लवकरात लवकर निविदा प्रक्रिया रावबून कंत्रटदार निश्चीत करण्यात यावा अशी मागणी खासदार शिंदे यांनी आयुक्त श्रीनिवास यांच्या भेटी दरम्यान केली आहे.

रिंग रोडच्या आठव्या टप्प्याचे नियोजन करावे

रिंग रोडचा सातवा टप्पा हा टिटवाळा येथे संपतो. हा रस्ता पुढे गोवेली येथे जाऊन जोडला जावा. हा रस्ता कल्याण मुरबाड रोडला जोडण्यासाठी अतिरिक्त आठव्या टप्प्याचे नियोजन करण्यात यावे. हा टप्पा केवळ दोन किलोमीटर अंतराचा आहे. एक नवी कनेक्टीव्हीटी तयार होऊन त्यांचा स्थानिक नागरीकांसह प्रवाशांना फायदा होणार आहे.

Web Title: The tender process for the third phase of the ring road started early, MP shrikant shinde