भिवंडीत उड्डाणपुलावर हाईट बॅरेकेटिंग मध्ये अडकला टेम्पो, वाहतुकीचा बोजवारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 19:24 IST2022-03-15T19:23:58+5:302022-03-15T19:24:21+5:30
भिवंडी शहरातील उड्डाणपूल हे अवजड वाहतुकीस बंद असल्याने फक्त दुचाकी व हलक्या कार सारख्या वाहनांना या उड्डाणपुला वर वाहतुकीस परवानगी असून टेम्पो व अवजड वाहनांना या उड्डाणपुलावर बंदी आहे .

भिवंडीत उड्डाणपुलावर हाईट बॅरेकेटिंग मध्ये अडकला टेम्पो, वाहतुकीचा बोजवारा
नितिन पंडीत
भिवंडी :
भिवंडी शहरातील उड्डाणपूल हे अवजड वाहतुकीस बंद असल्याने फक्त दुचाकी व हलक्या कार सारख्या वाहनांना या उड्डाणपुला वर वाहतुकीस परवानगी असून टेम्पो व अवजड वाहनांना या उड्डाणपुलावर बंदी आहे. त्यासाठी कल्याण नाका ते साईबाबा मंदिर दरम्यान असलेल्या स्व बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर हाईट बॅरेकेटिंग लावण्यात आले आहेत. परंतु अतिउत्साही वाहन चालक या उड्डाणपुलावर आपला टेम्पो जाऊ शकतो या अंदाजाने टेम्पो घेऊन जातात परंतु एका चालकाने अतिउत्साहत आपला टेम्पो उड्डाणपुलावरून घेऊन जाण्याच्या प्रयत्नांत असताना हाईट बॅरेकेटिंग मध्ये तो अडकून पडला व थेट पुढील बाजू कडून उचलला गेला. यामुळे या एकेरी उड्डाणपुला कडील वाहतूक बंद पडल्याने खालील रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता.त्यानंतर वाहतूक पोलिसांनी सुमारे एक तासा नंतर टेम्पो बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली.