दुचाकी चोरीत तरुणी, अल्पवयीन मुलाचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 06:45 IST2017-11-29T06:45:20+5:302017-11-29T06:45:28+5:30

शहरात दुचाकी चोरीच्या घटना थांबता थांबत नसून मीरा रोड येथील एका दुचाकी चोरीमध्ये तरुणीसह अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे.

 Teenage boy, little boy | दुचाकी चोरीत तरुणी, अल्पवयीन मुलाचा सहभाग

दुचाकी चोरीत तरुणी, अल्पवयीन मुलाचा सहभाग

मीरा रोड : शहरात दुचाकी चोरीच्या घटना थांबता थांबत नसून मीरा रोड येथील एका दुचाकी चोरीमध्ये तरुणीसह अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे.
मीरा भाईंदरमध्ये दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपी पकडून दुचाकी जप्त केल्या असल्या तरी दुचाकींच्या चोºया मात्र सुरूच आहेत. शहरात इमारतींची संख्या मोठी असली तरी त्यात पुरेशी वाहने पार्किंगची सुविधाच नसल्याने बहुतांश रहिवाशी सर्रास आपली वाहने रस्त्यावरच बेकायदा उभी करतात. बाहेर वाहने उभी करताना त्याच्या सुरक्षिततेची काळजी मात्र रहिवाशी घेत नाहीत.
याचाच पुरेपूर गैरफायदा घेत मध्यरात्री वा पहाटेच्यावेळी चोरटे वाहने चोरी करतात. यामध्ये दुचाकी
वाहनांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत दुचाकी वा चारचाकी चोरी प्रकरणी अटक केलेले तरूण वा पुरुषच
आरोपी आहेत. मात्र नयानगरच्या
मीरा नर्सिंग होम गल्लीत झालेल्या दुचाकी चोरीमध्ये एका तरुणीसह अल्पवयीन मुलाचा सहभाग आढळला आहे.
येथील सवेरा इमारतीत राहणारे एजाज मोबीन सय्यद यांनी नेहमीप्रमाणे आपली दुचाकी इमारती बाहेरील रस्त्यावर उभी केली होती. परंतु पहाटे सव्वाचारच्या सुमारास एका दुचाकीवरून तरूणासह तरुणी व अल्पवयीन मुलगा गल्लीत आले. मुलाने एजाज यांची दुचाकी अगदी सहजरित्या चोरुन नेली. तर दुसºया दुचाकीवरील तरूण व तरुणी देखील सोबत पसार झाले.

आरोपींची छायाचित्रे व्हायरल

पोलिसांनी तरुण व तरुणीचे फुटेज आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केली आहेत. छायाचित्रातील आरोपी दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सुदाम शेळके यांनी केले आहे.

Web Title:  Teenage boy, little boy

टॅग्स :crimeगुन्हे