शेजाऱ्याला चिडवणं चिमुकल्याच्या जीवावर बेतलं; चिमुकल्याच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक
By पंकज पाटील | Updated: March 26, 2024 19:18 IST2024-03-26T19:17:58+5:302024-03-26T19:18:07+5:30
या प्रकरणात मुख्य आरोपीच्या कुटूंबाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

शेजाऱ्याला चिडवणं चिमुकल्याच्या जीवावर बेतलं; चिमुकल्याच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक
बदलापूर: शेजारी राहणाऱ्या नववर्षाच्या चिमुकल्याचा अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपीला मयत मुलगा सतत चिडवत असल्याच्या संतापातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.
बदलापूर जवळील गोरेगावात नऊ वर्षीय इबाद उभा चिमुकल्याचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली. शेजारीच राहणाऱ्या आरोपींनी त्याचे आधी अपहरण केले आणि त्यानंतर त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात कुळगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी सलमान मौलवी, सफवण मौलवी, आणि अब्दुल्ला मौलवी यांना अटक केली आहे. तर त्यांच्या कुटुंबातील इतर पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणात मुख्य आरोपीच्या कुटूंबाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे एसपी डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. तसेच इतरही बाबींचा पोलीस तपास करत असल्याची माहिती दिली आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातारण आहे. पोलिसांनी आरोपी सलमान मौलवी, सफवण मौलवी, आणि अब्दुल्ला मौलवी यांना उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाचे पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे