शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
3
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
4
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
5
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
6
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
7
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
8
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
9
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
10
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
11
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
12
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
13
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
14
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
15
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
16
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
17
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
18
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
19
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
20
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!

महापालिका शाळांवर आता अधिकाऱ्यांची पथके ठेऊ लागली लक्ष; आयुक्तांचा निर्णय  

By धीरज परब | Updated: January 28, 2023 13:03 IST

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासह गैरसोयी दूर करण्यासाठी आयुक्तांचा निर्णय  

भाईंदर-  मीरा भाईंदर महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा व सोयी- सुविधाचा आढावा घेऊन तो उंचावण्यासाठी आयुक्त यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ५ गट तयार केले आहेत . त्या अधिकाऱ्यांच्या पथकांनी शाळांना भेटी देऊन ४१ मुद्द्यांचा आढावा घेण्यास व त्याचा अहवाल आयुक्तांना सादर करण्यास सुरवात केली आहे.  

महापालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती, ऊर्दू व सेमी इंग्रजी अश्या ३६ शाळा आहेत. त्यात ८ हजार २५ इतके विद्यार्थी शिकत आहेत. मुळात खाजगी शाळां मधील शिक्षकांच्या तुलनेत पालिकेच्या शिक्षकांना गलेलठ्ठ पगार मिळत असताना शिक्षणाचा दर्जा मात्र सुमार आहे . महापालिका शाळांवर करोडोंचा खर्च करते . पण सुविधा नाहीत व शिक्षणाचा दर्जा उंचावला जात नसल्याने लोकं पालिका शाळां कडे पाठ फिरवतात . त्यामुळे शिक्षकांच्या कामांचा सुद्धा लेखाजोखा तयार करून त्यांच्यावर आवश्यकते नुसार कार्यवाहीची गरज व्यक्त होत होती.  

दरम्यान महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणात्मक शिक्षण मिळावे, शाळां मध्ये स्वच्छता - सोयी सुविधांचा दर्जा वाढवा ह्यावर आयुक्त  दिलीप ढोले यांनी लक्ष केंद्रित केले आहे.  गेल्या वर्षी आयुक्तांनी पालिका शिष्टमंडळास दिल्ली सरकारच्या शाळांची पाहणी करण्यासाठी पाठवले होते . त्या पाहणी नुसार शिष्टमंडळाने अहवाल सादर केला होता . आयुक्तांनी शाळां मध्ये डिजिटल वर्ग तयार करून त्याची सुरवात केली आहे .  तसेच मुख्याध्यापक - शिक्षकांच्या बैठका घेऊन आढावा घेणे , शिक्षकांना मार्गदर्शनपर प्रशिक्षण देणे , शाळांना भेटी देणे , अभ्यासपर भिंती रंगवणे आदी उपक्रम आयुक्तांनी चालवले आहेत. 

आता आयुक्तांनी प्रत्येक शाळा निहाय शैक्षणिक दर्जा , स्वच्छता , सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गट तयार केले आहेत . उपायुक्त, शिक्षणाधिकारी, सहायक आयुक्त , लेखाधिकारी , उद्यान अधीक्षक , प्रभाग अधिकारी, आरोग्य अधिकारी, सिस्टीम मॅनेजर, समाज विकास अधिकारी , केंद्र प्रमुख अश्यांचा समावेश ह्या गटां मध्ये करण्यात आला आहे . प्रत्येक गटात ७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

गट क्र . २ मध्ये ८ शाळा असून उर्वरित चार गटां मध्ये प्रत्येकी ७ शाळांचा समावेश करण्यात आला आहे . सदर अधिकाऱ्यांच्या गटाने त्यांना जबाबदारी दिलेल्या शाळांची पाहणी करून तेथील स्वच्छता , व्यवस्था, रंगरंगोटी, इमारतीची स्थिती, पिण्याचे पाणी, अग्निशमन व्यवस्था, सीसी टीव्ही, स्वच्छतागृहांची स्वच्छता, शिक्षकांची उपस्थिती, मुलांकडे असलेली पुस्तके, वह्या व गणवेश, सुरक्षा व्यवस्था, विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, शिक्षणाचा दर्जा  आदी ४१ मुद्द्यांचा आढावा घ्यायचा आहे . त्याची छायाचित्रे काढून घ्यायची आहेत . त्याचा सविस्तर अहवाल महापालिका आयुक्तांना द्यायचा आहे.

सदर गटांनी पहिल्या फेरीतील अहवाल आयुक्तांना सादर केले असून आयुक्तांनी त्या बाबत बैठक घेऊन आढळून आलेल्या त्रुटी दूर करणे व उपाययोजना यांची पूर्तता करण्यास संबंधित विभागांना सांगितले आहे . पुढील भेटीदरम्यान अधिकाऱ्यांच्या गटाने आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी झाली आहे का, याची खात्री करून त्याचा सुद्धा अहवाल द्यायचा आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर