व्हिक्टरी क्रिकेट क्लब आयोजित द्वितीय महिला लिग क्रिकेट स्पर्धेत टीम ग्रीन अंतिम विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 14:09 IST2023-05-19T14:09:15+5:302023-05-19T14:09:59+5:30

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निव्या आंब्रे (106 धावा आणि 6 विकेट्स) हिची निवड तर फायनलमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून सिमरन शेख हिची निवड करण्यात आली.

Team Green won the second women's league cricket tournament organized by Victory Cricket Club | व्हिक्टरी क्रिकेट क्लब आयोजित द्वितीय महिला लिग क्रिकेट स्पर्धेत टीम ग्रीन अंतिम विजयी

व्हिक्टरी क्रिकेट क्लब आयोजित द्वितीय महिला लिग क्रिकेट स्पर्धेत टीम ग्रीन अंतिम विजयी

विशाल हळदे

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व्हीक्टरी क्रिकेट क्लब आयोजित आणि श्री ओमकार इन्फोकॉम प्रा.लि. प्रायोजित ,जैन इरिगेशन सिस्टम्स लि व ईगल ठाणे स्ट्रायकर्स सहप्रायोजित ,द्वितीय महिला लीग टुर्नामेंट क्रिकेट स्पर्धेत टीम ग्रीन ने टीम रेड चा 56 धावांनी पराभव करून विजय संपादन केला. 

टीम ग्रीनने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात 115 धावा केला. त्यात अचल वाळंजु 56 धावा (59 चेंडू) यात 7 चौकार आणि 1 षटकार, सिमरन शेख 63 धावा (25 चेंडू) यात 7 चौकार आणि 3 षटकार यांचा समावेश होता. अचल आणि सिमरनने 6.4 षटकांमध्ये 81 धावांची भागीदारी केली. त्यानंतर खेळण्यास उतरलेल्या टीम रेड ने 18.5 षटकांमध्ये सर्व गडी बाद 109 धावा केल्या. यात वृषाली भगत 21 धावा आणि सिद्धेश्वर पागधरे यांचा 31 धावांचा वाटा होता. निव्या आंब्रे व समृद्धी राऊळ यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. 

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निव्या आंब्रे (106 धावा आणि 6 विकेट्स) हिची निवड तर फायनलमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून सिमरन शेख हिची निवड करण्यात आली. तसेच अंतिम फेरीतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणूनही निव्या आंब्रे (3.5-1-8-3) हिची निवड आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून माही ठक्कर हिची निवड करण्यात आली.

Web Title: Team Green won the second women's league cricket tournament organized by Victory Cricket Club

टॅग्स :thaneठाणे