कोरोनाच्या सर्व्हेसाठी गेलेल्या शिक्षकांना मुंब्य्रात अटकाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 12:53 AM2020-04-16T00:53:53+5:302020-04-16T00:54:06+5:30

रहिवाशांच्या मानसिकतेमुळे धोका वाढण्याची शक्यता, धमकी देऊन कागदपत्रे फाडली, दोषींवर गुन्हा दाखल

Teacher who goes for coronas survey detained in Mumbai | कोरोनाच्या सर्व्हेसाठी गेलेल्या शिक्षकांना मुंब्य्रात अटकाव

कोरोनाच्या सर्व्हेसाठी गेलेल्या शिक्षकांना मुंब्य्रात अटकाव

Next

ठाणे : मुंब्य्रात कोरोना रु ग्णांच्या संख्येत एकीकडे वाढ होत असताना दुसरीकडे येथील रहिवाशांच्या मानसिकतेमुळे कोरोनाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवावर उदार होऊन मुंब्रा कौसात कोरोनाची लक्षणे कोणाला आहेत का, याचा सर्व्हे करणाऱ्या शिक्षकांना सर्व्हेसाठी पुन्हा आलात तर खबरदार अशी धमकी देऊन सर्व्हेचे कागद फाडण्यापर्यंतची कौसातील नागरिकांची मजल गेली आहे.

कौसा भागातील नशेमन अपार्टमेंटमध्ये बुधवारी सकाळी १२.३० च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला असून अशाप्रकारे जर सर्व्हेला विरोध होत असेल तर मुंब्य्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होणार असा मोठा प्रश्न आता निर्माण झाला असून प्रशासनाने दोषींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे मुंब्रा आणि कळव्याचे आहेत. कळवामध्ये १५ तर मुंब्य्रात १७ कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आहेत. त्यामुळे मुंब्रा कौसा भागात लक्षणे कोणत्या नागरिकाला आहेत का? याची तपासणी करण्यासाठी सर्व्हे सुरू असून या शिक्षकांकडून पोलीस संरक्षणाची मागणी होत आहे.

मुंब्य्रात सर्व्हेला विरोध होत आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या- त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची समजूत काढण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी पोलीस तक्र ार करणे शक्य नाही. त्यामुळे सर्व्हेला अडथळा येण्याची शक्यता आहे. मात्र, जर कोणी जाणूनबुजून या सर्व्हेला विरोध करत असेल तर ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. यापूर्वी दोघांच्या विरोधात तशा स्वरुपाचा गुन्हा दाखल केला असून बुधवारीदेखील एकावर गुन्हा दाखल केला आहे.
- मनीष जोशी, उपायुक्त, ठामपा

हे राष्ट्रीय काम असून शिक्षक आपल्या जीवववर उदार होऊन हे काम करत आहेत. एकमेकांच्या संपर्कात येऊन या रोगाचा प्रसार वाढत असल्याने हा सर्व्हे अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, अशा प्रकारे जर विरोध होत असेल तर त्यांना पोलीस संरक्षण मिळणे आवश्यक आहे . महापौर म्हणून मी पाठपुरावा करणारच आहे. प्रशासनाने देखील ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवी.
- नरेश म्हस्के, महापौर, ठामपा

 

Web Title: Teacher who goes for coronas survey detained in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.