शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Tauktae Cyclone: नरेंद्र मोदी हे तर गुजरातचे पंतप्रधान; नाना पटोले यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 20:06 IST

Tauktae Cyclone: पंतप्रधान महोदयांनी वादळाच्या फटका बसलेल्या गुजरात राज्याचा दौरा करून मदतीची घोषणा फक्त गुजरातसाठी करून ते गुजरात राज्याचेच पंतप्रधान आहेत अशा पद्धतीची एक जाणीव या देशाच्या जनतेला त्यांनी करून दिली आहे

पालघर दि 20 मे: पंतप्रधान महोदयांनी वादळाच्या फटका बसलेल्या गुजरात राज्याचा दौरा करून मदतीची घोषणा फक्त गुजरातसाठी करून ते गुजरात राज्याचेच पंतप्रधान आहेत अशा पद्धतीची एक जाणीव या देशाच्या जनतेला त्यांनी करून दिली आहे अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पालघर येथील उसरणी गावी केली.उसरणी येथे तोक्त चक्रीवादळाच्या तडाख्यात मातेश्वरी व लक्ष्मी मैया या दोन मच्छीमार बोटिंग चे खडकावर आपटून फुटून त्यांचे नुकसान झाले होते त्यांच्या पाहणी साठी अस्लम शेख काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खासदार हुसेन दलवाई राजेंद्र गावित आमदार राजेश पाटील श्रीनिवास वनगा काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय पाटील व अधिकारी वर्ग उपस्थित होते यावेळेस चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छिमार तसेच किनारपट्टी वरील गावे शेतकरी यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.आमचा दुश्मन देश पाकिस्तान आहे त्याला तुम्ही मोफत लस दिली तुम्ही पाकिस्तानी धार्जिणे झालात का असाही आरोप नाना पटोले यांनी केला लसीकरण अभावी लोक मरत आहेत अशा वेळेस त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असेल तर हे काही बरोबर नाही भारतातील जनतेचे अस्तित्व त्याची सुरक्षा त्यांचा जीव महत्त्वाचा आहे नरेंद्र मोदीच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही देशाच्या जनतेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे याच्याकडे त्यांनी लक्ष घालावे त्याचप्रमाणे राष्ट्रीय आपदा व्यवस्था बनवण्याचा काम संसदेने केले आहे देशातील राज्याच्या पैसा एनडीआरएफ मध्ये जातो केंद्राकडे मदत मागता असं विरोधी पक्षाकडून बोलले जाते ही केंद्राची जबाबदारी आहे ही राष्ट्रीय आपदा आहे कृत्रिम नाही म्हणून दरवेळेस आम्ही केंद्राकडे पैसे मागतो अगोदर त्यांनी राष्ट्रीय आपदा कायदा वाचून घ्यावा व समजून घ्यावा असेही पाटोळे म्हणाले.केंद्र सरकारचे लसीच्या बाबतीत नियोजन इतके खराब झालेली आहे की देशातील जनतेस पैसे देऊनही आज लस उपलब्ध होत नाही आज कुठल्याही देशात ज्यांनी ज्यांनी लसीचे उत्पादन केले आहे त्यांनी प्रथम आपल्या नागरिकांना लसीकरणासाठी प्राधान्य दिले आहे जेव्हा स्वतःच्या देशातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असेल तर त्यांनी दुसऱ्या देशात द्यायचे काम केले आहे आपल्या देशात फक्त 10 ते 12 टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे आपण बाकीच्या देशात वाटप करू लागलो यामुळे काय परिस्थिती निर्माण झाली हे सर्वांनाच अनुभवले आहे आपल्या लोकांचे जिव जात आहेत जगात जास्त मृत्यू हे आपल्या देशात होत आहेत. जगात मोठी महामारी येणार आहे.आपल्याला पाहिजे तसेच झाले पाहिजे ह्या खाक्या मुळे जनतेस नुकसान सोसावे लागत आहे असे असलम शेख यांनी यावेळेस सांगितले. त्याचप्रमाणे मच्छीमार तसेच वादळाचा तडाखा बसलेल्या किनारपट्टीची पाहणी करून नुकसान झालेल्या मच्छिमार तसेच किनारपट्टीवरील नागरिकांना तातडीने मदत जाहीर केले जाईल असेही असलम शेख म्हणाले

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ