शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
4
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
5
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
6
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
7
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
8
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
9
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
10
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
11
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
12
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
13
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
14
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
15
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?
16
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?
17
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
18
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
19
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
20
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

नेवाळी आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:43 AM

कोरेगाव भीमा आंदोलनात दाखल केलेले गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले. मात्र, हक्काच्या शेतजमिनी परत मिळवण्यासाठी वर्षभरापूर्वी झालेल्या नेवाळी आंदोलनातील शेतकरी

कल्याण : कोरेगाव भीमा आंदोलनात दाखल केलेले गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले. मात्र, हक्काच्या शेतजमिनी परत मिळवण्यासाठी वर्षभरापूर्वी झालेल्या नेवाळी आंदोलनातील शेतकरी व आंदोलकर्त्यांविरोधातील गंभीर गुन्हे सरकारने मागे घेतलेले नाहीत. ते गुन्हा मागे घ्यावेत, अशी मागणी नेवाळी ग्रामस्थ आणि आंदोलकांनी केली आहे.१९४२ मध्ये ब्रिटिश सरकारने नेवाळी येथे विमानतळासाठी एक हजार ६०० हेक्टर जागा ताब्यात घेतली होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी ही जागा शेतकऱ्यांना अद्याप परत केलेली नाही. आता त्याच जागेवर संरक्षक भिंत नौदलाने बांधण्यास सुरुवात केली आहे. त्याविरोधात वर्षभरापूर्वी २२ जून २०१७ ला नेवाळी येथे झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. याप्रकरणी शेकडो आंदोलकाविरोधात गंभीर गुन्हे पोलिसांनी दाखल केले.नेवाळी आंदोलनाला एक वर्ष झाल्यानिमित्त शुक्रवारी नेवाळी आंदोलन जागर सभा चिंचवली येथील समाज मंदिरात झाली. याप्रसंगी भाजपा नेते जगन्नाथ पाटील, शिवसेना आमदार सुभाष भोईर, काँग्रसेचे नेते संतोष केणे, जमीन बचाव संघर्ष समितीचे मथूर म्हात्रे, चैनू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.वर्ष उलटले तरी सरकारने नेवाळी आंदोलनानंतर हा प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कायदेशीर मार्गाने हा लढा देण्यासाठी चांगल्या वकिलांची फौज निर्माण करावी लागेल. नेवाळी येथील शेतजमीन परत न मिळाल्याने हे आंदोलन झाले. मात्र, सरकारने पुन्हा भाभा अणुसंशोधन संशोधन केंद्रासाठी येथील १३ एकर जागा घेण्याचा घाट घातला आहे. त्यालाही ग्रामस्थांचा विरोध असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.नेत्यांनी नेवाळी आंदोलकांची फसवणूक केली आहे. जो नेता आपले प्रश्न सोडवित नाही. त्याला मतदान करू नका. त्याला निवडून देऊ नका. आपल्या गावात पक्षाचा झेंडा नको. त्याऐवजी एकीचा झेंडा लावा, अशी विविध मते या सभेतून पुढे आली. आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले की, नेवाळीचा प्रश्न सुटला नाही, हे मी मान्य करतो. मात्र त्यासाठी प्रयत्नच झाले नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. मी, आमदार गणपत गायकवाड आणि जगन्नाथ पाटील यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. माझ्यासाठी पक्ष नाही, तर समाज महत्त्वाचा आहे. समाजाचा प्रश्न सुटणार नसेल तर आमदारकीवर लाथ मारण्याची तयारी आहे. आमदारकी पाच वर्षांकरीता आहे. समाज जीवनभर आहे. मात्र, आपल्याच समाजातील काही लोक आमचे पाय खेचून अन्य समाजातील नेत्यांची मखलाशी करतात, अशी टीका भोईर यांनी केली.केणे यांनी सांगितले की, नेवाळी आंदोलनाचा दिवस हा काळा दिवस नाही. शेतकरी, समाजाला जागा करणारा जागृत दिन आहे. शेतकºयांवर गोळा चालविणाºया सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे.