शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सातनंतर सुरू राहणाऱ्या दुकानांवर कारवाई करा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 12:09 AM

आयुक्तांचे आदेश : ७२ आस्थापने सील

ठाणे : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सायंकाळी सातपर्यंत सर्व आस्थापना सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. महापालिकेनेही तशा प्रकारचे आदेश जारी केले आहेत. तरीही काही आस्थापना सायंकाळी सातनंतरही सुरू राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे सातनंतर ज्या आस्थापना उघड्या आहेत अशा आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश सोमवारी आयुक्तांनी दिले. दरम्यान, ७२ आस्थापने सील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याबाबत सर्व साहाय्यक आयुक्तांनी रोज सायंकाळी सात ते साडेसात या कालावधीत आपल्या प्रभागामध्ये फिरून सातनंतर सुरू असणाºया तसेच ज्या ठिकाणी गर्दी होते अशा आस्थापना, अन्न पदार्थांच्या स्टॉल्सवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बैठक संपल्यानंतर महापालिकेने कारवाई सुरू करून काही दुकाने सील केली. शहरातील काही झोपडपट्टी भागात तसेच सोसायटीच्या ठिकाणी सातनंतरही दुकाने उघडी राहत असल्याचे दिसत होते. तर काही ठिकाणी नागरिक गर्दी करीत असताना दिसत होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करण्यात येत नसल्याने कोरोना वाढण्याचा धोका यामुळे वाढला असल्याचे आयुक्तांनी सांगितले होते.‘मास्कची सक्ती करा’सर्व साहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या प्रभाग समिती अंतर्गत नागरिकांनी मास्कचा वापर करावा यासाठी जास्तीतजास्त जनजागृती करावी; तसेच नागरिकांना मास्कचा वापर करण्याची सक्ती करावी. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश त्यांनी दिले. या बैठकीला परिमंडळ उपायुक्त आणि सर्व साहाय्यक आयुक्त उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका