शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीच्या चार नामनियुक्त नगरसेवकांचे निलंबन रद्द; हायकोर्टाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:22 IST

सिद्धेश्वर मोगलप्पा कामूर्ती, राहुल छगन खटके, मोहम्मद साजीद अशफाक खान व देवानंद रूपचंद थळे यांचे निलंबन रद्द

मुंबई : भिवंडी महापालिकेवर नऊ महिन्यांपूर्वी नामनियुक्तीने नेमलेल्या सिद्धेश्वर मोगलप्पा कामूर्ती, राहुल छगन खटके, मोहम्मद साजीद अशफाक खान व देवानंद रूपचंद थळे या चार नगरसेवकांची नियुक्ती निलंबित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. परिणामी, हे चौघेही पुन्हा नगरसेवक म्हणून काम करू शकतील.भिवंडी-निजामपूर महापालिकेने १२ जुलै २०१८ च्या ठरावाने या चौघांसह आठ जणांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून निवड केली. पाच महिन्यांनी श्याम मनसुखलाल अगरवाल या निवडून आलेल्या भाजप नगरसेवकाच्या तक्रारीवरून नगरविकास खात्याने महापालिकेचा संपूर्ण ठराव निलंबित न करता त्यातील फक्त चौघांच्या नियुक्तीचा भाग २७ नोव्हेंबर २०१८ रोजी निलंबित केला.याविरुद्ध या चौघांनी केलेल्या याचिका मंजूर करून न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. बी.पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने सरकारचा निर्णय रद्द केला. मुळात महापालिकेच्या ठरावात सरकारने हस्तक्षेप करण्याचे सबळ कारण नव्हते. चारही निलंबित नगरसेवक काँग्रेसचे आहेत. भिवंडी महापालिकेत युतीची सत्ता आहे. त्यामुळे भाजप नगरसेवकाच्या तक्रारीचे निमित्त करून सरकारने विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना निलंबित करण्याचे राजकारण केले. हा पक्षीय राजकारणासाठी अधिकारांचा उघडपणे केलेला सवंग वापर आहे, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.खंडपीठाने म्हटले की, या चौघांची नामनियुक्ती नियमांनुसार नाही, असे अगरवाल यांना वाटत होते तर त्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग त्यांना उपलब्ध होता. त्याप्रमाणे त्यांनी याचिका केलीही होती. परंतु त्यावर आदेश होण्याआधीच त्यांनी सरकारकडे धाव घेतली. सरकारनेही अगरवाल यांना पर्याय उपलब्ध नाही, असे खोटे कारण देत त्यांच्या तक्रारीची दखल घेतली.न्यायालय म्हणते की, सरकारने हा निर्णय घेण्याचे समर्पक कारण दिलेले नाही. या चौघांच्या नियुक्त्या नियमांनुसार झाल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसते, एवढेच सरकारने म्हटले. एवढेच नव्हे तर पाच महिन्यांपूर्वी झालेल्या या नेमणुका आता का निलंबित केल्या जात आहेत, याचाही खुलासा केलेला नाही.या सुनावणीत याचिकाकर्त्या नगरसेवकांसाठी अ‍ॅड. ड. रामदास सब्बन, राज्य सरकारसाठी सहायक सरकारी वकील कीर्ति कुलकर्णी तर महापालिकेसाठी अ‍ॅड. नारायण बुबना यांनी काम पाहिले.पुन्हा असे वागू नकाया प्रकरणात वैधानिक अधिकारांचा राजकारणासाठी वापर केल्याचे स्पष्ट झाल्याने भविष्यात पुन्हा असे करण्यास संबंधित धजावू नयेत, यासाठी सरकारला दाव्याच्या खर्चापोटी अद्दल घडेल, एवढा दंड लावावा, अशी मागणी अ‍ॅड. सब्बन यांनी केली. मात्र सरकारी वकिलाने गयावया केल्याने खंडपीठाने तसा आदेश दिला नाही.

टॅग्स :bhiwandiभिवंडीMumbai High Courtमुंबई हायकोर्ट