शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास निलंबनाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:57 IST

राज्यातील आरोग्य विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याचे तसेच महत्त्वाच्या बैठकांना दांडी मारीत असल्याचे निदर्शनास आले आहे

नारायण जाधवठाणे : राज्यातील आरोग्य विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याचे तसेच महत्त्वाच्या बैठकांना दांडी मारीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधीकधी तर डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्ण दगावण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.आरोग्य विभागाच्या २१ जून २०१८ च्या निर्णयानुसार पूर्वपरवानगीशिवाय आपल्या कामाच्या ठिकाणाचे मुख्यालय सोडल्यास किंवा महत्त्वाच्या बैठकांना दांडी मारणाºया कर्मचारी आणि अधिकाºयांवर एका महिन्याच्या आत निलंबनाची कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत....तर वरिष्ठ अधिकारी जबाबदारडॉक्टर वा कर्मचाºयांच्या अनुपस्थितीअभावी ग्रामीण भागात प्रसुती झालेल्या अवघडलेल्या महिला, सर्प, विंचु किंवा अपघातग्रस्त रुग्ण यांचे तर यामुळे खूपच हाल होतात. परंतु, शासनाच्या नव्या आदेशांमुळे या सर्वांना मोठा दिलासा मिळणार आहे.दोषींवर अशी कारवाई केली नाही तर त्यांना पाठिशी घालणाºया संबधित अधिकाºयास जबाबदार धरण्यात येईल,असेही बजावण्यात येणार आहे.यांना बसणार फटकाआरोग्य विभागाच्या आदेशाचा दणका ठाणे जिल्ह्यातील १ जिल्हा रुग्णालय, २ उपजिल्हा रुग्णालय, ६ ग्रामीण रुग्णालये आहेत. तर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील १० रुग्णालये, १ विशेष रुग्णालये, ८ वाखाने, १ प्रसुतीगृह,३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १८७ उपकेंद्रातील २३४ डॉक्टर, ६०० परिचारीकांसह इतर कर्मचाºयांना बसणार आहे.ठाणे हा सर्वात जास्त नागरिकरण झालेला राज्यातील मोठा जिल्हा असून जिल्ह्यात सहा महापालिकांसह ग्रामीणही मोठा आहे. यात शहापूर, मुरबाड सारखे आदिवासी तालुकेही आहेत.येथील दुर्गम भागातील अनेक दवाखाने, ग्रामीण रुग्णालयातील बहुतांश डॉक्टर व अनेक कर्मचारी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडतात. काही तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली सारख्या शहरी भागात राहून येजा करतात.यात बºयाचदा ते जिल्हारूग्णालय, तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात हजर नसतात. पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडतात, सुटीत परदेशात जातात. यामुळे अनेकदा आरोग्यसेवेचे संपूर्ण नियोजन कोलमडते.पावसाळ्यात तर ग्रामीण भागातील रूग्णांचे अतोनात हाल होतात. ठाणे हा अतिवृष्टीचा जिल्हा असून येथे १२०० ते २००० मिमीपर्यंत वार्षिक पाऊस पडतो. यामुळे साथीचे आजार येथे नेहमीच डोकेवर काढतात.एका महिन्याच्या आत होणार कारवाईअनेकदा डॉक्टरच रुग्णालयात नसल्याने रुग्ण दगावतो. किंवा त्यांचे आजार बळावतात. यामुळे आरोग्य विभागाने हे आदेश काढले आहेत. यानुसार अशा कामचुकार कर्मचाºयांच्या अनुपस्थितीचा अहवाल वरिष्ठांना पाठवायचा आहे. त्यानंतर अशा कर्मचाºयांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आले नाही तर त्यांना एका महिन्याच्या आत निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई करावयाची आहे.