शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्विकासासाठी ठाण्यातील झोपड्यांचा होणार सर्व्हे

By admin | Updated: January 8, 2016 02:02 IST

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने शहर स्मार्ट करण्याचा विडा उचलला असताना त्याचाच एक भाग म्हणून हाऊसिंग फॉर आॅल योजनेच्या माध्यमातून शहरातील

अजित मांडके, ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने शहर स्मार्ट करण्याचा विडा उचलला असताना त्याचाच एक भाग म्हणून हाऊसिंग फॉर आॅल योजनेच्या माध्यमातून शहरातील झोपड्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेने शहरातील झोपड्यांचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांत तो पूर्ण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. पुनर्विकासाच्या पायलट प्रोजेक्टसाठी एका झोपडपट्टीची निवड केली जाईल. ती झोपडपट्टी कोणती असेल, कोणत्या प्रभागातील असेल, याबाबत आतापासूनच उत्सुकता वाढली आहे.केंद्र व राज्य शासनाच्या सर्वांसाठी घरे - हाऊसिंग फॉल आॅल या योजनेंतर्गत अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यासाठी, त्याअंतर्गत खाजगी-लोकसहभागातून गृहनिर्माण प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. हा प्लॅन तयार करण्यासाठी केंद्र शासन व राज्य सरकारकडून ३५ लाखांचे अनुदान पालिकेला मिळणार आहे. त्यानुसार, सल्लागाराच्या माध्यमातून संपूर्ण शहरासाठीचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यात संपूर्ण शहरात किती झोपड्या आहेत, त्यात किती कुटुंबे राहतात, याची माहिती गोळा केली जाईल. त्यानंतर, संपूर्ण शहराचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. यात शहरातील झोपड्यांचा कशा पद्धतीने विकास केला जाऊ शकतो, कोणत्या माध्यमातून केला जाऊ शकतो, कोणत्या नियोजन प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास केल्यास योग्य ठरेल, किती घरांची आवश्यकता भासेल, पुनर्विकासासाठी किती घरांची बांधणी करावी लागेल. त्या ठिकाणी असलेली लोकसंख्या, घरांच्या बांधणीसाठी येणारा एकूण खर्च, त्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधा आणि सध्या हे क्षेत्र कसे आहे, याचा समावेश त्यात असेल.