सुप्रियाताई सुळे, चाकणकर गप्प का? तक्रारदार रिदा रशीद यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 13:17 IST2022-11-15T13:15:24+5:302022-11-15T13:17:52+5:30

Rida Rashid: जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी केलेल्या गैरवर्तनाबाबत महिलांच्या सन्मानाची भाषा करणाऱ्या खा. सुप्रिया सुळे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर या गप्प का, त्यांचा महिलांच्या सन्मानाविषयीचा कळवळा आता गेला कुठे, असा सवाल रिदा रशीद यांनी सोमवारी केला. 

Supriyatai Sule, why is Chakankar silent? Complainant Rida Rashid's question | सुप्रियाताई सुळे, चाकणकर गप्प का? तक्रारदार रिदा रशीद यांचा सवाल

सुप्रियाताई सुळे, चाकणकर गप्प का? तक्रारदार रिदा रशीद यांचा सवाल

मुंबई : राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी ठाण्यातील एका फ्लायओव्हरच्या उद्घाटनावेळी आपल्याशी केलेल्या गैरवर्तनाबाबत महिलांच्या सन्मानाची भाषा करणाऱ्या खा. सुप्रिया सुळे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर या गप्प का, त्यांचा महिलांच्या सन्मानाविषयीचा कळवळा आता गेला कुठे, असा सवाल भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री रिदा रशीद यांनी सोमवारी केला. 
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्र परिषदेत रशीद म्हणाल्या की, आमंत्रण असल्यामुळे मी तेथे गेले होते. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मी बाजूला थांबले होते. मुख्यमंत्री वाहनातून निघाले असताना मी त्यांना भेटण्यासाठी जात असताना समोरून येणाऱ्या राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी मला सरळ बाजूच्या पुरुषांच्या गर्दीत ढकलून दिले. ढकलून देत असताना, ‘तू इथे काय करते आहेस,’ असे ते म्हणाले. या घटनेबाबत आपण पोलिसांकडे तक्रार केली असून त्यानुसार प्राथमिक माहिती अहवाल दाखल झाला आहे. या घटनेची ध्वनी चित्रफीत सर्वत्र प्रसारित झाली असून त्यात आव्हाड यांनी मला कोणत्या पद्धतीने ढकलले हे स्पष्टपणे दिसते आहे. माझ्या तक्रारीबाबत पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करावी, एवढेच माझे म्हणणे आहे, असेही  रशीद म्हणाल्या.

Web Title: Supriyatai Sule, why is Chakankar silent? Complainant Rida Rashid's question