शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेविरोधात मूक निषेधाला पाठिंबा

By admin | Updated: February 3, 2016 02:08 IST

धनश्री गोडवे या तरुणीचा धावत्या लोकलमधून पडून सोमवारी अपघाती मृत्यू झाला. त्या आधी भावेश नकाते या डोंबिवलीच्याच युवकाचा आणि कांबळे यांचाही रेल्वेतून पडून मृत्यू झाला होता

डोंबिवली : धनश्री गोडवे या तरुणीचा धावत्या लोकलमधून पडून सोमवारी अपघाती मृत्यू झाला. त्या आधी भावेश नकाते या डोंबिवलीच्याच युवकाचा आणि कांबळे यांचाही रेल्वेतून पडून मृत्यू झाला होता. मध्य रेल्वे प्रशासनावर नकातेसह कांबळेंच्या घटनेनंतर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. त्यावेळी व्हॉट्सअ‍ॅपवरील तो व्हिडीओ व्हायरला झाल्याने आणि ‘लोकमत’सह प्रसिद्धी माध्यमांनी तो विषय उचलून धरल्याने दिल्ली दरबारी त्याबाबतची विचारणा झाली होती. मात्र तरीही अशा घटनांवर आळा बसलेला नाही. त्यासाठी प्रवासी संघटना बुधवारी जो मूक निषेध करणार आहेत, त्याला सर्वपक्षिय नेत्यांनी पाठींबा दिला आहे.मंगळवारी ‘लोकमत’मध्ये या अपघातासह धनश्रीच्या वडीलांची खंत आणि उपनगरिय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या वतीने जे आंदोलन करण्यात येणार आहे त्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्याला भाजपसह मनसेने आधीच पाठींबा दिला. त्याची दखल घेऊन शिवसेनेनेही या निषेध सभेला पाठींबा जाहिर केला. बुधवारच्या निषेध सभेला आमदार रवींद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम, शहर प्रमुख भाऊ चौधरी, भाजपचे शशिकांत कांबळे, नगरसेवक आदींसह पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. ठिकठिकाणच्या प्रवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होणार आहेत. रामनगर तिकिट खिडकीसमोरील जागेत ही सभा स. ९ वा. होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी सांगितले.