स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १५८ विद्यार्थ्यांचे सूर्यनमस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:36 AM2021-01-22T04:36:19+5:302021-01-22T04:36:19+5:30

ठाणे : स्वामी विवेकानंद यांच्या १५८ व्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणेतर्फे १५८ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ...

Sun salutation of 158 students on the occasion of Swami Vivekananda's birthday | स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १५८ विद्यार्थ्यांचे सूर्यनमस्कार

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १५८ विद्यार्थ्यांचे सूर्यनमस्कार

Next

ठाणे : स्वामी विवेकानंद यांच्या १५८ व्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणेतर्फे १५८ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सूर्यनमस्कार आयोजित केले आहेत. सूर्यवंदना हा अभिनव उपक्रम २२ जानेवारी रोजी सकाळी होणार आहे. या उपक्रमात ठाण्यातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

सूर्यनमस्कार हा योगाचा परिपूर्ण प्रकार आहे. शरीर आणि मनाचे सबलीकरण करणारे सूर्यनमस्कार तरुणाईला उपयुक्त आहेत. सूर्यनमस्काराचा प्रसार तरुणांच्या माध्यमातून करण्याची अभाविपची योजना आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून सूर्यवंदना होणार आहे. अशा प्रकारे ठाण्यात होणारा हा पहिला कार्यक्रम आहे. १२ जानेवारी, स्वामी विवेकानंद जयंती आणि २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभाविप ठाणेतर्फे होणाऱ्या युवक सप्ताहाचा भाग म्हणून सूर्यवंदनाचे आयोजन केले आहे.

Web Title: Sun salutation of 158 students on the occasion of Swami Vivekananda's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.