वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो-४ प्रकल्पाची यशस्वी चाचणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 15:44 IST2025-09-22T15:44:23+5:302025-09-22T15:44:37+5:30

Metro-4 Project : मुंबई महानगरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो चार प्रकल्पावरील मेट्रोची चाचणी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील घोडबंदर येथील गायमुख येथे पार पडली.

Successful testing of Wadala-Ghatkopar-Kasarvadavali Metro-4 project | वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो-४ प्रकल्पाची यशस्वी चाचणी 

वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो-४ प्रकल्पाची यशस्वी चाचणी 

ठाणे - मुंबई महानगरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो चार प्रकल्पावरील मेट्रोची चाचणी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील घोडबंदर येथील गायमुख येथे पार पडली. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, मेट्रोचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

या प्रकल्पासाठी जवळपास १६ हजार कोटी खर्च करण्यात येत आहेत. दैनंदिन प्रवासी संख्या १३ लाख ४७ हजार अपेक्षित असून पूर्ण मार्ग सुरू झाल्यावर ही संख्या अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. मेट्रोसाठी मोघरपाडा येथे डेपो करिता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ४५ हेक्टर जागा त्याठिकाणी उपलब्ध झाली असल्यामुळे मेट्रो ४ मेट्रो ४ अ मेट्रो १० आणि ११ डेपो म्हणून काम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्व उपनगरे पश्चिम उपनगरे मुंबई आणि ठाणे असे जोडणारा मार्ग असणार आहे. 

Web Title: Successful testing of Wadala-Ghatkopar-Kasarvadavali Metro-4 project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.