भिवंडीत विद्यार्थ्यांच्या बसला अपघात, बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू तर 5 विद्यार्थी जखमी
By नितीन पंडित | Updated: December 17, 2022 18:51 IST2022-12-17T18:50:48+5:302022-12-17T18:51:57+5:30
बस चालक अपघातानंतर बस सोडून फरार झाला आहे. संजयसिंग लालबहाद्दूर सिंग वय ४० असे पादचारी व्यक्तीचे नाव आहे.

भिवंडीत विद्यार्थ्यांच्या बसला अपघात, बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू तर 5 विद्यार्थी जखमी
भिवंडी - भिवंडी वाडा रस्त्यावरील नदी नाका येथे शनिवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास दुगाड येथील होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसच्या चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला असून, बस विद्युत खांबास जोरात धडकल्याने बसमधील पाच विद्यार्थी जखमी झाले आहे.
बस चालक अपघातानंतर बस सोडून फरार झाला आहे. संजयसिंग लालबहाद्दूर सिंग वय ४० असे मयत पादचारी व्यक्तीचे नाव आहे. भिवंडी वाडा रस्त्यावरील शेलार ग्रामपंचायत हद्दीतील केशव नगर संतोष डाइंग येथे हा अपघात घडला असून या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करीत फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विषेश म्हणजे सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडून या अपघाताची अधिकृत माहिती पत्रकारांना देण्यासाठी तालुका पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात येत होती.