शहापूरजवळ ५ वाहनांचा विचित्र अपघात; ३ जणांचा मृत्यू, १४ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 07:37 IST2025-01-15T07:36:57+5:302025-01-15T07:37:27+5:30

जखमी झालेल्यांपैकी ८ जणांना ठाणे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांची प्रकृती  चिंताजनक आहे.

Strange accident involving 5 vehicles near Shahapur, Thane; 3 killed, 14 injured | शहापूरजवळ ५ वाहनांचा विचित्र अपघात; ३ जणांचा मृत्यू, १४ जखमी

शहापूरजवळ ५ वाहनांचा विचित्र अपघात; ३ जणांचा मृत्यू, १४ जखमी

- शाम धुमाळ

कसारा : मुंबई - नाशिक महामार्गावरील शहापूर गोठेघरजवळ भरधाव कंटेनरने इतर पाच वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ३.५० च्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या एका कंटेनरने समोरील तीन वाहनांसह दुसऱ्या मार्गिकेवरील एका बसला धडक दिली. या विचित्र अपघातात ३ बस प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाले आहेत. या जखमी झालेल्यांपैकी ८ जणांना ठाणे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांची प्रकृती  चिंताजनक आहे. तर ६ जण शहापूर येथे उपचार घेत आहेत. मृतांमध्ये १ पुरुष व २ महिलांचा समावेश आहे.

दरम्यान, जखमी प्रवासी हे ट्रक,टेम्पो आणि बसमधील असून अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, महामार्ग पोलीस केंद्राच्या छाया कांबळे,  शहापूर महामार्ग पोलीस, शहापूर पोलीस,आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे.  तसेच, या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरु असून महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

Web Title: Strange accident involving 5 vehicles near Shahapur, Thane; 3 killed, 14 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.