बदलापुरात रंगणार व्हॉलीबॉलची राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा

By पंकज पाटील | Published: December 20, 2023 07:32 PM2023-12-20T19:32:18+5:302023-12-20T19:33:31+5:30

या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्राच्या संघासाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

state level selection test tournament of volleyball will be held in badlapur | बदलापुरात रंगणार व्हॉलीबॉलची राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा

बदलापुरात रंगणार व्हॉलीबॉलची राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा

पंकज पाटील, बदलापूर: बदलापुरात २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर असे चार दिवस महाराष्ट्र राज्य अजिंक्य पद हॉलीबॉल स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यांचे संघ सहभागी होणार आहेत या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्राच्या संघासाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे.

यंदाची ५४ वी वरिष्ठ गट महाराष्ट्र राज्य अजिंक्य पद ही हॉलीबॉल स्पर्धा बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरातील जिमखाना क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष किरण भोईर यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी राज्यभरातून येणाऱ्या संघांपैकी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची थेट राष्टीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार असल्याने या स्पर्धेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

त्यामुळे अविष्कार सांस्कृतिक व क्रीडा मंडळ आणि ठाणे हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि आयोजक किरण भोईर यांच्यामार्फत बदलापूरच्या जिमखाना क्रीडांगणावर या स्पर्धेची जोरदार तयारी सुरु आहे. संपूर्ण राज्यातून तब्बल 900 हून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सर्व सोय आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील खेळाडू बदलापूरत येऊन चमकदार कामगिरी करतील अशी अपेक्षा भोईर यांनी व्यक्त केले आहे. 

Web Title: state level selection test tournament of volleyball will be held in badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.