शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

लाच म्हणून शरीर सुखाची मागणी करण्याच्या प्रकरणाचे केडीएमसीच्या स्थायी समितीत तीव्र पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 4:51 PM

कल्याण डोंबिवली महापालिकेत महिलेकडे लाचेच्या स्वरुपात शरीर सुखाची मागणी केल्याच्या प्रकरणाचे स्थायी समितीत तीव्र पडसाद उमटले.

कल्याण - पैशाच्या स्वरुपात लाच मागण्याची प्रकरणे अनेक घडली असली तरी कल्याण डोंबिवली महापालिकेत महिलेकडे लाचेच्या स्वरुपात शरीर सुखाची मागणी केल्या प्रकरणी महापालिकेच्या कर विभागातील लिपिक रमेशचंद्र लक्ष्मण राजपूत याला ठाणे लाच लुचपच प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या घटनेपश्चात ‘आम्हाला देखील असुरक्षित वाटत असल्या’ची भावना स्थायी समिती सदस्या कस्तूरी देसाई यांनी व्यक्त केली आहे. आज शनिवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेना सदस्य वामन म्हात्रे यांनी महापालिकेची प्रतिमा यापूर्वी भ्रष्ट होती. अनेक अधिका:यांनी लाच घेतल्याचे उघड झाले आहे. भ्रष्टाचाराचा वेगळाच प्रकार महापालित रजपूत यांच्या प्रकरणानंतर उघड झाला आहे. त्यामुळे महापालिकेची प्रचंड बदनामी झाली आहे. अशा प्रकारची केस महाराष्ट्रात प्रथमच घडली आहे. ही काही महापालिकेची चांगली बाब नाही. प्रशासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा. रजपूतच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली. सदस्य वामन म्हात्रे यांनी उपस्थित केलेल्या गंभीर विषयावर मनसे सदस्य देसाई यांनी रजपूत यांनी जो प्रकार केला आहे. त्यामुळे आम्हा महिला नगरसेविकांनाही असुरक्षित वाटत आहे. नागरीकांच्या समस्या व विविध विकास कामांसाठी विविध खात्याच्या अधिकारी वर्गाकडे जात असतो. या प्रकरणानंतर आम्ही अधिका-यांकडे कामानिमित्त जायचे की नाही असा प्रश्न यातून उपस्थित झाला आहे.आम्हाला काही एक सुरक्षितता नसते. त्यामुळे अशा प्रकारची हिंम्मत यापूढे कुठलाही अधिकारी करणार नाही. यासाठी रजपूत प्रकरणात कठोर कारवाई केली जाणो अपेक्षित आहे अशी मागणी केली. देसाई यांच्या मुद्याला धरुनच शिवसेना सदस्या शालिनी वायले यांनी आम्हाला काही एक सुरक्षितता नाही. त्यामुळे आम्हाला महिला सुरक्षा रक्षक पुरविला जावा. एखाद्या महिलेशी असे वर्तन करण्याची एका लिपिकाची कशी काय हिंम्मत होते. यावरुन वरिष्ठांचा त्यावर काही एक वचक नाही. यामुळे महापालिकेची बदनामी झालेली आहे. लाच प्रकरणात केवळ निलंबन केले जाते. केवळ निलंबित करण्याची कारवाई न होता त्यापेक्षा जास्त कठोर कारवाई केली जावी.शिवसेना सदस्या प्रियंका भोईर यांनी हा प्रकारच मुळात निंदनीय आहे. रजपूतला निलंबीत न करता. त्याला सेवेतून कायम स्वरुपी बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केली आहे. महिलांचा हा राग आणि संताप पाहून सदस्य वामन म्हात्रे यांनी आत्ताच कारवाईचे आदेश द्या अशी आग्रही मागणी केली. सदस्यांच्या भावना तीव्र आणि संतापजनक आहे. त्यांच्या भावनांशी समिती सहमत असल्याचे सभापती दीपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले. रजपूत याला या प्रकरणात केवळ निलंबित न करता त्याला महापालिका सेवेतून बडतर्फ करण्यात यावे असे आदेश उपायुक्त मिलिंद धाट यांना दिले आहे. उपायुक्त धाट यांनी रजपूत याच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. समितीचा प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवून पुढील कार्यवाही केली जाईल. त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका