सेंट जोसेफ शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षकाची मारहाण, खांदेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 21:27 IST2017-11-11T21:26:58+5:302017-11-11T21:27:21+5:30

सतत वादग्रस्त राहीलेली नवीन पनवेल सेक्टर ७ माधिल सेंट जोसेफ शाळेतील तीन विद्यार्थ्याना शिक्षकानी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

In St. Joseph's school, the students filed a complaint with the teacher, Khandeshwar police station | सेंट जोसेफ शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षकाची मारहाण, खांदेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

सेंट जोसेफ शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षकाची मारहाण, खांदेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

पनवेल - सतत वादग्रस्त राहीलेली नवीन पनवेल सेक्टर ७ माधिल सेंट जोसेफ शाळेतील तीन विद्यार्थ्याना शिक्षकानी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तीनही विद्यार्थी पाचवीत शिकत असून यासंदर्भात पालकानी शिक्षकांविरोधात खांदेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
   

सोहम पवार (१०) श्रेयश कावले(वय.१०) विशाखा सुरवसे (१० ) अशी या विद्यार्थ्याची नावें आहेत. नोट बुक पूर्ण न केल्याने ही मारहाण केल्याचा आरोप पालकानी केला आहे. लाकडी पट्टी व डस्टर च्या सहाय्याने ही मारहाण केली असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पालकानी यासंदर्भात शनिवारी खांदेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

Web Title: In St. Joseph's school, the students filed a complaint with the teacher, Khandeshwar police station

टॅग्स :Crimeगुन्हा