क्रिकेट स्पर्धेत श्री माँ विद्यालय अंतिम फेरीत, आज फायनल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 12:07 IST2023-04-22T12:05:21+5:302023-04-22T12:07:34+5:30

एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील कामगिरी

Sri Maa Vidyalaya in final round of cricket tournament, final today | क्रिकेट स्पर्धेत श्री माँ विद्यालय अंतिम फेरीत, आज फायनल

क्रिकेट स्पर्धेत श्री माँ विद्यालय अंतिम फेरीत, आज फायनल

विशाल हळदे, ठाणे: एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत श्री माँ विद्यालय, ठाणे व लोकपुरम स्कूल, ठाणे यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्री माँ विद्यालयाने एकतर्फी विजय संपादन करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

लोकपुरम शाळेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. श्री माँ विद्यालयाच्या अद्विक मंडलिकने फिरकीच्या तालावर लोकपुरमच्या फलंदाजांना नाचवले. त्याने 3 बळी घेतले तर आदित्य कौलगी ने 2 बळी घेतले. रुद्र चाटभर, कामेश जाधव आणि ईशांत तावडे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. लोकपुरम विद्यालयाने सर्वबाद 69 धावा केल्या. त्याला उत्तर देताना श्री माँ विद्यालयाने 11.4 षटकात एक बाद 70 धावा करून एकहाती सामना जिंकला.

ठाणे जिल्ह्यातील आंतरशालेय विद्यार्थांसाठी गेली 47 वर्षे खेळवली जाणारी स्टार स्पोर्टस् क्लब आयोजित आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा संकुल येथे सुरू आहे.

 

Web Title: Sri Maa Vidyalaya in final round of cricket tournament, final today

टॅग्स :thaneठाणे