शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

अटी मान्य असतील तरच बोला; लग्नाच्या बाजारात डॉक्टर, इंजिनीअरची क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 00:31 IST

ठाण्यातील तरुणींची पहिली पसंती : शेतकरी, छोटी नोकरी, व्यवसाय करणाऱ्या मुलांना मिळताे आहे नकार  

स्नेहा पावसकरठाणे : गेल्या काही वर्षांत लग्न जमणे हा जणू एक सोहळा आणि तो जमवणे म्हणजे एक व्यवसाय झाला आहे. लग्न जमवताना आधी विचारल्या जातात त्या अपेक्षा; पण आता या अपेक्षांना अटीचे स्वरूप आले आहे. पूर्वीच्या काळी घरातील वडीलधारी मंडळी ठरवतील तिथे मुलं-मुली लग्न करायची. कालांतराने मुलांच्या अटी विचारात घेऊ जाऊ लागल्या आणि आता तर मुलांपेक्षा मुलींच्याच अटी जास्त पाहायला मिळतात. ठाणे जिल्ह्यातील कित्येक मुलींच्या लग्नासाठीच्या अपेक्षा अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत. या मुलींना शेतकरी किंवा एखादी छोटी नोकरी किंवा व्यवसाय करणारा नवरा नको तर त्यांना हवाय डॉक्टर, इंजिनीअर किंवा एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीतला उच्चपदस्थ अधिकारी आणि चाळीत, झोपडपट्टीत राहणारा नाही, तर एखाद्या हायफाय सोसायटीत राहणारा.

लग्न करायचं म्हटलं की, बदलत्या काळानुसार बहुतांश कुटुंबात वधू-वर दोघांच्याही अपेक्षा जाणून घेतल्या जातात. पण, या अपेक्षा दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. ग्लोबल होणाऱ्या ठाणे जिल्ह्याचा बराच भाग अद्यापही ग्रामीण बाजाचा आहे. येथील अनेक तरुण शिक्षणाअभावी पारंपरिक शेतीचा व्यवसाय करतात. बळीराजा लाखोंचा पोशिंदा आहे, मात्र लग्नाच्या मांडवात याची किंमत काडीमोल आहे. ठाणे जिल्ह्यात अनेक वधू-वर सूचक मंडळे आहेत. त्यात हजारो तरुण-तरुणींची नोंदणी आहे. मात्र, यातील बहुतांशी तरुणींच्या अपेक्षा पाहता त्यांना वर निवडताना तो उच्चशिक्षित, उच्चपदस्थ नोकरीचा आणि उच्चभ्रू वस्तीत राहणारा हवा आहे. 

सर्वाधिक मागणी...लग्न करताना हल्लीच्या मुलींच्या अपेक्षा मोठ्या आहेत. डॉक्टर, इंजिनीअर, मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला असलेला, बँकेत उच्चपदस्थ अधिकारी असलेला मुलगा त्यांना वर म्हणून हवा आहे. शेतकरी मुलगा नवरा म्हणून स्वीकारणाऱ्या मुली खूपच कमी आहेत. किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्याच मुली शेतकरी मुलाची निवड करतात.

अटी मान्य असतील तरच बोलामुलींच्या इतरही अनेक अटी दिसतात. मुलींना मुंबई, ठाणे, पुण्यात राहणारा नवरा हवाय. तसेच एकत्र कुटुंबात न राहता लग्नानंतर स्वतंत्र राहण्याची त्यांची मागणी असते. एकत्र कुटुंब असले तरी ते छोटे असावे, स्वतंत्र बेडरूम असावा. शेती असली तरी शेतात काम करावे लागणार नसेल तर विचार करू, असे वधूपक्षाच्या कुटुंबीयांचे म्हणणे असते.

आमची मुलगी चांगली शिक्षित असली तर तिच्या भविष्याचा विचार आम्ही करणारच ना? एवढं शिकून तिला शेतात काम करावे लागले तर काय उपयोग? तिचा संसार तिच्या मनासारखा व्हावा हीच आमची इच्छा असते. - दिनेश धारीवाल, वधूपिता

शेतकरी हा माणूस नाही का? एखाद्या उच्चशिक्षितापेक्षाही शेतकरी अधिक मेहनत करतो. आता निसर्ग साथ देत नाही आणि मालाला योग्य भाव मिळत नाही, म्हणून शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारत नाही. पण, शेतकऱ्याला लग्नाच्या मांडवात नाकारणे चुकीचे आहे.    - बळीराम पानरे, वरपिता

एखादा मुलगा शेतकरी असेल तर त्याबाबत मुली फारशा चौकशीही करीत नाहीत. त्यातही जर एखाद्याची घरची भरपूर जमीन, शेती असेल आणि तिथे शेतात काम करावे लागणार नसेल तरच त्या स्थळाचा विचार करतात. अन्यथा त्यांना चांगला नोकरदार मुलगाच नवरा म्हणून हवाय, अशी माहिती एका वधू-वर सूचक मंडळाच्या प्रमुखांनी दिली.

टॅग्स :marriageलग्नdoctorडॉक्टर