भिवंडीत समाजवादी नेते आबू आझमी यांच्या परिवर्तन सभेचे आयोजन

By नितीन पंडित | Updated: November 2, 2023 19:12 IST2023-11-02T19:12:47+5:302023-11-02T19:12:50+5:30

भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात मागील चार वर्षात राज्य शासन त्या सोबतच महानगर पालिका प्रशासना कडे पाठपुरावा केल्यामुळे अनेक विकास कामे मार्गी लागले आहेत

SP leader Abu Azmi organized a transformation meeting in Bhiwandi | भिवंडीत समाजवादी नेते आबू आझमी यांच्या परिवर्तन सभेचे आयोजन

भिवंडीत समाजवादी नेते आबू आझमी यांच्या परिवर्तन सभेचे आयोजन

भिवंडी: भिवंडी शहरात समाजवादी पक्षाच्या माध्यमातून मागील चार वर्षात झालेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी सात वाजता परिवर्तन सभेचे आयोजन शांतीनगर केजीएन चौक या ठिकाणी करण्यात आले असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.सभेपूर्वी आमदार अबू आसिम आजमी यांची रांजनोली साईबाबा नाका ते केजीएन चौक येथे पर्यंत भव्य स्वागत यात्रेचे सुद्धा आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार शेख यांनी यावेळी दिली आहे.

भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात मागील चार वर्षात राज्य शासन त्या सोबतच महानगर पालिका प्रशासना कडे पाठपुरावा केल्यामुळे अनेक विकास कामे मार्गी लागले आहेत.तर शहरातील मेट्रो प्रकल्प तसेच काँक्रीट रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केल्यामुळे ती कामे गतिमान झाले असल्यामुळे शहरातील नागरिकांना याबाबत माहिती देण्यासाठी या परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार शेख यांनी दिली आहे. विशेष म्हणजे सध्या राज्यात मराठा आंदोलन तीव्र झाले असतानाच राज्यात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा देखील समोर आला असतांना भिवंडीतील जाहीर सभेत आझमी नक्की काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: SP leader Abu Azmi organized a transformation meeting in Bhiwandi