गिटार वाजवण्याच्या नादात, तरुण पडला गटारात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 21:21 IST2020-06-17T21:20:22+5:302020-06-17T21:21:16+5:30

तरुण गटारात पडल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा करत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना कळवले

At the sound of playing the guitar, the young man fell into the gutter | गिटार वाजवण्याच्या नादात, तरुण पडला गटारात  

गिटार वाजवण्याच्या नादात, तरुण पडला गटारात  

डोंबिवली - गिटार वाजवण्याच्या नादात सचिन सोनवणे(36) हा युवक नेतीवली टेकडी समोरील मोठ्या गटारात पडल्याची घटना बुधवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. तो तरुण गटारात पडल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा करत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना कळवले, त्यांनीही प्रसंगावधान राखून तातडीने घटनास्थळी धाव घेत त्या पुरुषाला अवघ्या 5 ते 10 मिनिटात गटाराच्या घाणीतून बाहेर काढले. त्याला पाण्याने अंघोळ घालून त्याच्याकडून त्याच्या कुटुंबियांची माहिती घेतली, आणि त्यानूसार घरच्यांशी संपर्क करून घडली घटना सांगितली. काही वेळात त्या पुरुषाचे कुटुंबीय घटनास्थळी गेले, ओळख पटवुन त्यास घरी घेऊन गेल्याची माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी दिलीप गुंड यांनी सांगितले.

Web Title: At the sound of playing the guitar, the young man fell into the gutter