शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ठाणे जिल्ह्यात आंबा, चिक्कूच्या फळबागांसह सोनचाफा, मोगर १3१४ हेक्टरवर; राज्यभरासाठी अभिमानास्पद

By सुरेश लोखंडे | Updated: October 19, 2023 14:39 IST

जिल्ह्यात आंबा, चिक्कूच्या फळबागांसह सोनचाफा, मोगर १3१४ हेक्टरवर; राज्यभरासाठी अभिमानास्पद!

सुरेश लोखंडे

ठाणे : यंदा खरीपाच्या लागवडीसह आंबा, चिक्कू, सीताफळ, काजू, केळी, नारळीच्या बांगासह सोनचाफा, मोगरा, चंदन फुलशेतीची लागवड तब्बल एक हजार 3१४ हेक्टरवर करण्यासाठी शेतक-यांना कृषी खात्याने तत्पर केले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील या फळबाग लागवडी राज्यात अव्वल आहे. त्यामुळे राज्याच्या कृषी आयुक्तालय, फलोत्पादनचे संचालक डॉ. के.पी. मोते यांनी ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधीकार दिपक कुटे यांचे विशेष अभिनंदन करून हे काम अभिमानास्पद व कौतुकास्पद असल्याचे सुतोवच अभिनंदनपर पत्राव्दारे केले आहे.या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम यंदाही राज्यात हाती घेण्यात आला आहे. या २०२3-२४ च्या कार्यक्रमाचा राज्यस्तरीय आढावा अलिकडेच संचालकांनी घेतला. त्यात ठाणे जिल्ह्याने एक हजार ५०० हेक्टरच्या लक्षांकापैकी आतापर्यंत एक हजार 3१४ हेक्टरवर फळबाग लागवडीसह फूलशेतीची काम पूर्ण केल्याचे उघड झाले. या ह्यअतिशय उल्लेखनीयह्ण कामाची दखल घेत राज्याच्या संचालकांनी विशेष अभिनंदन करून ठाणे जिल्ह्यातील हे काम अभिमानास्पद व कौतुकास्पद असल्याच्या गौरवोद्गाराव्दारे जिल्ह्याच्या कृषी अधीक्षकांच्या कामाची दाखल घेतली आहे.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शेतक-यांना फळबागांसह चाफा, मोगरा आदी फुलशेतीकडे वळण्याचे आवाहन केले होते. त्यास अनुसरून कृषी विभागाने झापाटल्यागत काम करून लक्षांकाच्या तुलनेत ८६.६६ टक्के काम पूर्ण केल्याचे उघड झाले आहे. ४५ ते ५० हेक्टरवर चाफा, मोगरा, चंदना फुलशेती यंदा जिल्ह्यात केली जात आहे. यामध्ये मोगरा १3.९५ हेक्टर, सोनचाफा २८.3२ हेक्टर,चंदनाची शेती दीड हेक्टरवर जिल्ह्यात हाती घेती आहे.या फळबाग, फुलशेतीकडे वळलेल्या दोन हजार ५१२ शेतक-यांपैकी एक हजार ९५४ शेतक-यांनी त्यांच्या एक हजार 3१४ हेक्टर शेतीवर फळबाग व फूलशेतीची लागवड पूर्ण केली आहे. यामध्ये सवार्धिक आंब्याच्या बागा एक हजार १६3 हेक्टरवर आहेत. तर नारळी पोफळीच्या बागा २६ हेक्टरवर आहेत. याशिवाय चिक्क्ू चार हेक्टर, काजू 3.९५ हेक्टर, फणस नऊ हेक्टर,शेवगा १९.५० हेक्टर, जांभूळ १६.८५ हेक्टर, केळी १.७० हेक्टर, सीताफळ १२ हेक्टर आदीं शेत जमिनीवर फळबागांची ही लागवड पूर्ण झाली आहे.तालुकानिहाय आंब्याच्या सवार्धिक बागा खालीलप्रमाणे

शहापूर तालुक्यात सर्वाधिक ४१४ हेक्टरवर आंबा लागवड झाली. मुरबाड तालुक्यात 3११हेक्टर, भिवडी २४६ हेक्टर, उल्हासनगर ९० हेक्टर आणि कल्याण येथे १०० हेक्टरवर आंब्याच्या बागा आहेत.