CoronaVirus: मरणयातना! लॉकडाऊनमुळे वडिलांचा मृतदेह दुचाकीवरून नेण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 18:46 IST2020-03-27T18:41:14+5:302020-03-27T18:46:56+5:30
सर्पदंशामुळे वडिलांचा मृत्यू; लॉकडाऊनमुळे मृतदेह दुचाकीवरून नेण्याची वेळ

CoronaVirus: मरणयातना! लॉकडाऊनमुळे वडिलांचा मृतदेह दुचाकीवरून नेण्याची वेळ
- शशिकांत ठाकूर
कासा- डहाणू तालुक्यातील कासा उपजिल्हा रुग्णालयातून सर्पदंश झालेल्या वडिलांना आणताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. मात्र लॉकडाऊनमुळे मुलाला त्यांचा मृतदेह मोटारसायकलवरुन न्यावा लागला.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन सुरू असून रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे कासा भागातील पालघर तालुक्यातील चिंचारे येथील एका व्यक्तीचा मृतदेह त्याच्या दोन मुलांनी चक्क दुचाकीवरून आपल्या घराकडे नेला. चिंचारेचे रहिवासी असलेल्या लडका देवजी वावरे (वय 60) यांना 24 मार्च रोजी सकाळी 8 वाजता सर्पदंश झाला होता. त्यांना उपचारांसाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्याचं सांगत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला.
घरी आणल्यावर दुसऱ्या दिवसी (आज) त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागले. त्यांना मोटरसायकलवरून रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेत त्यांची प्रकृती बिघडली आणि ते मृत पावले. मात्र घरी जाण्यासाठी वाहनाची उपलब्धता नसल्याने त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मोटरसायकलवरूनच माघारी नेण्याचा निर्णय घेतला. कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्य उपचार केले नसल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे.