शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

शहरातील विविध भागात काही प्रमाणात शिथीलता, काही ठिकाणी १० मे पर्यंत बंद कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 3:43 PM

कोरोनाचा वाढता धोका डोळ्यासमोर ठेवून महापालिकेच्या वतीने काही भागात अत्यावश्यक सेवेची दुकाने ठराविक वेळेत सुरु ठेवण्याचा तर काही भाग हे येत्या १० मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे : शहरातील लोकमान्यनगर-शास्त्रीनगर या प्रभाग क्र मांक ६ मधील करोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याने येथील टाळेबंदी काही प्रमाणात शिथील करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तर दुसरीकडे कोपरी, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि दिव्यातही काहीशी शिथिलता आणली असली तरी या भागातील अत्यावश्यक दुकानांसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यावेळेतच ही दुकाने सुरु राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.                     ठाणे शहरातील लोकमान्यनगर भागातील एका व्यक्तीचा महापालिकेच्या कळवा रु ग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. परिसरातील नागरिकांची त्याचे अंत्यदर्शन घेतले होते तर अनेकजण त्याच्या अंत्ययात्रेत सामील झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मृत पावलेल्या व्यक्तीला करोनाची लागण झालेली होती, अशी माहीती समोर आली होती. यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने हा परिसर पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेनंतर या भागात करोना रु ग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याचे चित्र होते. गेल्या दहा दिवसांपासून हा संपुर्ण परिसर बंद होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील करोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असून येथील परिस्थिती आटोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी यांची एक बैठक पार पडली. त्यामध्ये चर्चेअंती येथील टाळेबंदी काहीप्रमाणात शिथील करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार विठ्ठल मंदीर मैदानात तात्पुरत्या स्वरु पात फळ आणि भाजीपाला मंडई सुरु करण्यात येणार असून ही मंडई सकाळी ६ ते दुपारी ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. दुध डेअरी आणि अन्नधान्याची दुकाने सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत खुली राहणार असून त्याचबरोबर औषधांची दुकाने नेहमीप्रमाणेच सुरु राहणार आहेत. या सर्वच ठिकाणी नागरिकांना सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करण्याच्या सुचना पालिका प्रशासनाने केल्या आहेत. दुसरीकडे वागळेतही येत्या १० मे पर्यंत पूर्णपणे बंद पाळण्यात येणार आहे, तर कोपरीमध्येही काही निर्धारीत वेळेत दुकाने सुरु राहणार आहेत. तिकडे मुंब्रा आणि दिव्यातही अत्यावश्यक सेवेची दुकाने ही पहाटे ३ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. तर कळव्यातही सकाळच्या सुमारासच दुकाने सुरु राहणार असून नागरीकांनी सोशल डिस्टेसींगचे पालन करावे असे आवाहन पालिकेच्या वतीने देण्यात आले आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या