शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
4
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
5
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
6
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
7
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
8
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
9
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
10
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
11
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
12
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
13
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
14
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
15
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
16
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
17
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
19
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
20
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर

...तर आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये जावे लागेल, साहित्यिक राजन गवस यांना चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 13:12 IST

आज चेहरे नसलेला शत्रू हजारो हातांनी सामान्य माणसाला गिळत आहे.

ठाणे : आपण महाराष्ट्र म्हणून आजारी आहोत, याकडे आपण गांभीर्याने पाहिले नाही तर आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल, अशी चिंता कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), आनंद विश्व गुरूकुल, शारदा एज्युकेशन ट्रस्ट, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस यांनी व्यक्त केली. 

आज चेहरे नसलेला शत्रू हजारो हातांनी सामान्य माणसाला गिळत आहे. तेव्हा जबाबदारी लिहिणाऱ्यावर येते. त्यामुळे या आजारी महाराष्ट्राचे किमान संवेदनशील महाराष्ट्रात रूपांतर करणे ही आजची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आनंद विश्व गुरूकुल विधी महाविद्यालयाच्या जनकवी पी. सावळाराम सभागृहामध्ये रविवारी हे संमेलन झाले. गवस म्हणाले की, गेली ४४ वर्षे मी लिहित आहे, परंतु कधी नव्हे तो महाराष्ट्र हा आजारी पडला आहे. हा आजारांचा प्रदेश आहे. 

सामान्यांच्या प्राथमिक गरजा भागविणारी कल्याणकारी राज्याची संकल्पना होती, परंतु या संकल्पनेपासून आपण खूप दूर जाऊन  नव्या भांडवली व्यवस्थेत आहोत. जिथे महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रेही मरणपंथावर आहेत. मल्टिस्पेशालिटीने गोरगरिबांचे शोषण केले आहे. शिक्षणाची मंदिरे न राहता तिथे दुकानदारी सुरू झाली आहे. तिसऱ्या बाजूला संपूर्ण शेतीत उद्ध्वस्तता आहे. नद्यांची गटारे झाली आहेत, महानगरांत येणाऱ्या सगळ्या महामार्गांमुळे असंख्य शेतकरी भूमिहीन होत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, यात गोरगरीब मरत आहेत. या गोरगरिबांचा श्वास आपल्या साहित्याच्या केंद्रापर्यंत कधीतरी यायला हवा. साहित्यिकाच्या मनात या संपूर्ण व्यवस्थेचे प्रश्न येणे गरजेचे आहे. सामान्यांचा विचार करणारा आणि भांडवलदारी व्यवस्थेचे समर्थन करणारा अशा दोन विभागांमध्ये समाज विभागला गेला आहे. याकडे पाहताना समाजाचा घटक म्हणून मी अस्वस्थ आहे, असेही गवस यांनी सांगितले.  

‘कोमसाप’चे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर, विलास जोशी, विलास ठुसे व आदी उपस्थित होते. सुरुवातीला ‘बहर’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

माणूस वजा केला तर साहित्यामध्ये काहीच उरत नाही. माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू असतो. माणूस आणि त्याच्या भोवतालकडे पाहणे ही साहित्यिकाची अट असावी. पुणे, मुंबईत लिहिणारे लेखक आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये लिहिणाऱ्या साहित्यिकांची केंद्रे पाहिली तर साहित्याची केंद्रे ही सरकत चालली आहेत. - राजन गवस, संमेलनाध्यक्ष, ठाणे जिल्हा साहित्य संमेलन

टॅग्स :thaneठाणे