मॉर्निंग वॉकसाठी जाताना सोनसाखळी हिसकावली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 12:01 AM2021-05-04T00:01:26+5:302021-05-04T00:02:19+5:30

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ३० वर्षीय रहिवाशाची ६० हजारांची सोनसाखळी दोघांनी जबरीने हिसकावल्याची घटना रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Snatched the gold chain while going for the morning walk | मॉर्निंग वॉकसाठी जाताना सोनसाखळी हिसकावली

विटाव्यातील घटना

Next
ठळक मुद्दे विटाव्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ३० वर्षीय रहिवाशाची ६० हजारांची सोनसाखळी दोघांनी जबरीने हिसकावल्याची घटना रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळव्यातील विटावा कोळीवाडा येथे राहणारे एक ३० वर्षीय गृहस्थ २ मे रोजी सकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. ते विटावा भागातून जात असतांना त्यांच्या पाठीमागून पायी आलेल्या एकाने त्यांची सोनसाखळी जबरीने खेचली. त्यानंतर त्याच्या पाठीमागून मोटारसायकलीवरुन आलेल्या ३० ते ३५ वर्षीय साथीदाराबरोबर त्याने पलायन केले. हे दोघेही जुन्या बेलापूर रोडवरुन कळव्याच्या दिशेने पसार झाले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Snatched the gold chain while going for the morning walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.