जिल्ह्यातील शिधावाटप रास्त भाव दुकानांवर अन्नधान्याचे सुरळीत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:13 IST2021-03-13T05:13:51+5:302021-03-13T05:13:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांवर आता कार्डधारकाची खात्री पटवून अन्नधान्य देण्यासाठी त्यांचे ऑनलाइन थम्ब ...

Smooth distribution of foodgrains at ration shops in the district | जिल्ह्यातील शिधावाटप रास्त भाव दुकानांवर अन्नधान्याचे सुरळीत वाटप

जिल्ह्यातील शिधावाटप रास्त भाव दुकानांवर अन्नधान्याचे सुरळीत वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांवर आता कार्डधारकाची खात्री पटवून अन्नधान्य देण्यासाठी त्यांचे ऑनलाइन थम्ब घेतले जात आहेत. त्यामुळे योग्य व मूळ कार्डधारकालाच अन्नधान्य मिळाल्याची खात्री होत आहे. जिल्ह्यातील या रास्त भाव दुकानांवरील अन्नधान्य पुरवठा सुरळीत व योग्य दर्जाचा होत असल्याचे आढळले. मात्र, मुरबाड तालुक्यातील शेतकरी सहकारी संघाच्या रेशनिंग दुकांनावरील अन्नधान्य निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्याचा वापर थेट पोल्ट्री फार्मसाठी केला जात असल्याचे आढळले आहे.

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण आदी दोन विभागांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या शिधावाटप विभागाकडून अन्नधान्याचा पुरवठा रास्त भाव दुकानांना केला जात आहे. कोरोना महामारीच्या संचारबंदीत या दुकानांमधील अन्न धान्य पुरवठ्यावर नागरिकांना आपला उदरनिर्वाह करणे शक्य झाले. जिल्ह्याच्या शहरी भागात सात लाख १७ हजार ४८ हजार या अंत्योदय कार्डधारकांना दरमहा ३५ किलो अन्नधान्याचे वितरण होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात गहूऐवजी तांदूळ मोठ्या प्रमाणात वापरत आहे. यामुळे या ३५ किलो अन्नधान्यामध्ये २५ किलो तांदूळ आणि १० किलो गहू या अंत्योदय कार्डधारकास वितरण केले जात आहे. यामध्ये तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलोने या ग्राहकांकडून गव्हाची खरेदी केली जात आहे. या प्रमाणेच प्राधान्यक्रमाच्या कार्डधारकांना दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो धान्य दिले जात आहे. यामध्ये तीन रुपये दराने तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू प्रति किलो दोन रुपये दराने वितरण केले जात आहे. या पाहणीमध्ये बहुतांशी शिधावाटप विभागाच्या रास्त भाव दुकानांवर चांगल्या दर्जाचे अन्नधान्य वाटप केले जात आहे. त्यामुळे अंत्याेदय व प्राधान्यक्रम कार्डधारकांकडून त्यांचा लाभ घेतला जात आहे.

..........

Web Title: Smooth distribution of foodgrains at ration shops in the district