शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

स्मार्ट कल्याण वर्षभरात : द. कोरियाच्या शिष्टमंडळाची पाहणी, राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:18 IST

कल्याणच्या वाडेघर, सापार्डे येथे दक्षिण कोरियाच्या मदतीने साकारल्या जाणाºया स्मार्ट सिटीचे काम वर्षभरात सुरू होणार आहे. हा प्रस्ताव जरी राज्य सरकारच्या मान्यतेसाठी खोळंबला असला, तरी कोरियाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पाहणी करून तेथे नेमक्या कोणत्या योजना राबवता येतील याचा अंदाज घेतला.

कल्याण : कल्याणच्या वाडेघर, सापार्डे येथे दक्षिण कोरियाच्या मदतीने साकारल्या जाणाºया स्मार्ट सिटीचे काम वर्षभरात सुरू होणार आहे. हा प्रस्ताव जरी राज्य सरकारच्या मान्यतेसाठी खोळंबला असला, तरी कोरियाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पाहणी करून तेथे नेमक्या कोणत्या योजना राबवता येतील याचा अंदाज घेतला. नऊ महिन्यात सर्व परवानग्यांचे सोपस्कार पार पडले, की या स्मार्ट सिटीच्या उभारणीला सुरूवात होईल, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली.केडीएमसीने दक्षिण कोरियाच्या लॅण्ड अ‍ॅण्ड हाउसिंग कंपनीशी एप्रिलमध्येच सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार कंपनीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केडीएमसीला भेट दिली. याप्रसंगी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्क संग वू, अन्य अधिकारी, महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त पी. वेलरासू, शहर अभियंते प्रमोद कुलकर्णी, नगररचना विभागाचे प्रकाश रविराव, सुरेंद्र टेंगळे, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, भाजपा गटनेते वरुण पाटील, महिला-बाल कल्याण समिती सभापती वैशाली पाटील आदी उपस्थित होते. पार्क यांनी कल्याण-डोंबिवली ही मोठी शहरे आहेत. केडीएमसीचा प्रस्ताव चांगला आहे. त्याची प्रक्रियाही चांगली राबवली जात आहे आणि येथील जागा नदीला लागून असल्याने या शहरांची निवड केल्याचे सांगितले.आयुक्त वेलरासू यांनी सांगितले, ‘२५० एकर जागेवर योजना राबविली जाईल. त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. महासभेतही हा विषय ठेवला जाणार आहे. विविध प्रक्रिया पार पाडण्यास नऊ महिने लागतील. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास वर्षभराचा कालावधी लागू शकतो.’ या शिष्टमंडळाने वाडेघर परिसराला भेट देऊन प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. त्याचबरोबर काळा तलाव येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकालाही भेट देत आदरांजली वाहिली.कसे असेल स्मार्ट शहर? त्यातील विविध प्रकल्प-महापालिकेच्या नगररचना विभागाने टाउन प्लॅनिंग स्कीम तयार केली आहे. वाडेघर व सापाड यामधील २५० हेक्टर जागेवर त्याचा पहिला टप्पा विकसित केला जाणार आहे. ३२० हेक्टर जागेपैकी २११ हेक्टरच्या वाडेघरच्या जागेवर विकास केला जाणार आहे. दुसरा टप्प्यांत १०८ हेक्टर जागेवर योजना राबवली जाणार आहे. ४७ हेक्टर ही जागा सीआरझेडमध्ये आहे.२५० हेक्टरपैकी ६४ हेक्टर जागेवर रहिवास, २३ हेक्टर रस्ते, २९ हेक्टर आरक्षणाचे, १२३ ग्रीन झोनचे क्षेत्र आहे. या योजनेत आरक्षण बदलाची गरज भासणार नाही. १२३ हेक्टर ग्रीन झोन हा योजनेसाठी आपोआपच रहिवास क्षेत्र होणार आहे. २५० हेक्टरपैकी १६० हेक्टर जागा ही सापाड व ९० हेक्टर जागा ही वाडेघर येथे आहे. वस्तुत: सीआरझेडच्या जागेत जागा मालकाला कोणत्याही प्रकारचा विकास करता येत नाही.या योजनेमुळे सीआरझेड जागेचा विकास करता येणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर उंबर्डेचाही विकास केला जाणार आहे. सापाड, वाडेघर परिसरात मेट्रो रेल्वेचे अद्ययावत स्टेशन, शिवस्मारक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम, आयटी पार्क, एज्युकेशन हब, महापौर निवास, आयुक्त निवास, सायकल ट्रॅक, बोर्ड वॉक, जलवाहतुकीचे पोर्ट, उल्हास नदी वॉटर फ्रंटचा विकास, चार, सात आणि १९ मजली इमारती, आयकॉनिक टॉवरही उभारला जाणार आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका