शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीला तुटपुंज्या तरतुदीचा फटका

By admin | Updated: November 13, 2016 01:03 IST

ठाणे शहराचा स्मार्ट सिटीचा आराखडा सहा हजार ८४८ कोटी ४५ लाख रुपयांचा असताना या महापालिकेला आतापर्यंत केवळ एक कोटी रुपये, तर कल्याण-डोंबिवलीचा आराखडा एक हजार

कोल्हापूर : काळ्या पैशाच्या नावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुसती स्टंटबाजी सुरू आहे. बॉलिवूडच्या कलाकारांनीही मोदींकडून स्टंट शिकावेत, अशी बोचरी टीका सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू)चे राष्ट्रीय सचिव स्वदेश देवरॉय यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली. केंद्र सरकार येत्या संसदीय अधिवेशनामध्ये कामगारविरोधी विधेयक आणणार आहे. त्याला कडाडून विरोध करून ते हाणू पाडू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.यावेळी स्वदेश देवरॉय म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी ५०० व १००० च्या नोटा रद्द करण्याचा घेतलेल्या निर्णयाचा काळ्या पैशाशी काहीच संबंध नाही. याप्रश्नी मोदींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. यात त्यांचा स्वार्थ दिसत असून, सर्वसामान्यांना मात्र याचा त्रास होत आहे. काळा पैसा हा सोने, रियल इस्टेट, सिनेमा, आदी क्षेत्रांतील गुंतवणुकीत असतो, तो काही ५०० व १०००च्या नोटांमध्ये नाही. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हे कामगारविरोधी आहे. मोदी हे कामगार कायदा संपवून मालकांच्या बाजूने येणाऱ्या संसदीय अधिवेशनामध्ये विधेयक आणणार असून, ते कामगारविरोधी आहे. विधेयक आणण्याची त्यांनी पूर्ण तयारी केली आहे; परंतु ते विधेयक हाणून पाडण्यासाठी आम्हीही सज्ज आहोत. एका बाजूला काळ्या पैशाबद्दल बोलता आणि दुसऱ्या बाजूला कामगारांचे पैसे घेऊन मालकांचे भले करता हा सरकारचा विरोधाभास दिसत आहे.बांधकाम कामगारांच्या मागण्यांसंदर्भात कोल्हापुरात राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक घेतली जात आहे. यामध्ये कामगारांच्या मागण्यांसाठी व कामगार कायद्याच्या विरोधातील भूमिकेबद्दल सरकारविरोधात लढण्याकरिता कृती आराखडा (अ‍ॅक्शन प्लॅन) जाहीर केला जाणार आहे. येत्या अधिवेशनामध्ये दिल्लीत आंदोलन केले जाणार असून, आमच्याबरोबर शिवसेनेसह भारतीय मजदूर संघ, आयटक, आदी कामगार संघटनांही सहभागी होणार आहेत.यावेळी एम. एस. शेख, चंद्रकांत यादव, भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, प्रा. आबासाहेब चौगुले, शिवाजीराव मोरे, आदी उपस्थित होते.सरकारकडून माध्यमांंचा आवाज दाबण्याचा प्रयत्नहे सरकार प्रसिद्धीमाध्यमांचा आवाज दाबत आहे. एनडीटीव्हीच्या प्रक्षेपणावर काही दिवस बंदी घालून त्यांना नियंत्रणात आणण्याचा घाट घालत आहे. यामुळे परिस्थिती आणीबाणीसारखीच निर्माण झाली आहे, असे देवरॉय यांनी सांगितले.