शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

दिवाळीच्या फराळावर मंदीचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 12:49 AM

साहित्य महागले : तयार फराळाचा भाव स्थिर, मात्र मागणी रोडावली

- जान्हवी मोर्ये ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरात नोकरदार महिलांना घरी फराळ बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे दिवाळीत तयार फराळखरेदीवर त्यांचा भर असतो. यंदा साहित्य महागूनही तयार फराळाच्या किमती स्थिर आहेत; मात्र तरीही फराळासाठी मागणी नोंदवण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने फराळविक्रेते चिंतेत असून त्यांनाही बाजारातील मंदीचे चटके सहन करावे लागत आहेत.

फराळविक्रेते सुनील शेवडे म्हणाले की, सगळीकडे आर्थिक मंदीचे वातावरण आहे. लोकांमध्ये तयार फराळखरेदी करण्यात निरुत्साह दिसत असून परदेशातून ८० टक्के, तर स्थानिक पातळीवर केवळ ६० टक्केच बुकिंग झाले आहे. यंदा सीकेपी करंजीला मागणी अधिक आहे. या करंजीला अधिक घड्या पडतात आणि त्या तुलनेने लुसलुशीत असतात. साधी करंजी ४०० रुपये किलोने, तर सीकेपी करंजीला ६०० रुपये किलोचा भाव आहे. फराळाच्या साहित्यात मागच्या वर्षीपेक्षा यंदा फक्त खोबऱ्याच्या किमतीत घट झाली आहे. मात्र, इतर वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. तरीही, विक्रेत्यांनी फराळाच्या किमतीत मंदीमुळे वाढ केलेली नाही. डोंबिवलीतील पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपरकडील पूल बंद असल्याने छोट्या विक्रेत्याकडे फराळ पोहोचवताना आम्हाला त्रास होत आहे. वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. यंदा फराळात ठेपला पुरी आणि जवस पुरी वेगळी बनवली आहे. फराळासोबत अनेक जण ठेपला आणि जवस पुरीचेही बुकिंग करत आहे.

श्रीपाद कुलकर्णी म्हणाले की, जागतिक मंदीमुळे फराळाला मागणी कमी आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होऊनही आम्ही फराळाच्या किमतीत वाढ केली नाही. यंदा सर्वत्र निवडणुकीचा माहोल आहे. दिवाळी महिनाअखेरीस आल्यामुळे नागरिकांनी खरेदीच सुरू केलेली नाही. तसेच, निवडणुकीमुळे कामगारवर्गही प्रचारातील कामाला पसंती देतो. त्यामुळे फराळ तयार करण्यासाठी कामगार मिळणेही कठीण झाले आहे. कामगारांना तिकडे मानधन आणि दोन्ही वेळचे जेवण मिळत असल्याने ते तिकडे अधिक आकर्षित होतात. यंदा फक्त २५ टक्के फराळाचे बुकिंग झाले आहे. फराळात वेगळे काही केले नाही. दिवाळीच्या सुटीत लोक अनेकदा बाहेर जातात. त्यामुळे फराळाला मागणी कमी झाली आहे, असेही सांगितलेअसे आहेत अंदाजे भावभाजणीची चकली ४०० रुपये किलो, कडबोळी ४०० रुपये, तिखट शेव, लसूण शेव ३२० रुपये, पातळ पोहा चिवडा ३०० रुपये, फुलवलेला पोहा चिवडा ३०० रुपये, कोथिंबीर चिवडा ३४० रुपये, मसाला कोन ३२० रुपये, बेसन लाडू (साजूक तुपातील) सहा नग १२० रुपये, अनारसे पाच नग १०० रुपये, कानवले १० नग २४० रुपये, शंकरपाळे (गोडे) ३४० रुपये, चिरोटे एक पॅकेट २०० ग्रॅम ११० रुपये आहे. दिवाळी परदेशी फराळात हॅम्पर ए आणि स्टुडंट हॅम्पर बी असे दोन भाग केले आहेत. त्यात ‘हॅम्पर ए’साठी सहा हजार ९९९ रुपये, तर ‘हॅम्पर बी’साठी तीन हजार ९९९ रुपये मोजावे लागणार आहेत.

परदेशात मंगळवारी फराळ पाठवणारपरदेशात २२ आॅक्टोबरपर्यंत फराळ पाठवता येणार आहे. आमच्याकडे तयार फराळ आणि घरगुती फराळ असे दोन्ही प्रकार पाठवण्याची सोय आहे. त्यामुळे अस्सल घरगुती फराळाची चवही परदेशात घरबसल्या चाखता येते, असेही शेवडे म्हणाले.