पेढे खाल्ल्याने सहा जणांना विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 01:46 IST2019-06-09T01:45:56+5:302019-06-09T01:46:19+5:30

नंदकुमार सदगीर यांची मुलगी दुर्गानंद दहावी उत्तीर्ण झाली म्हणून पेढे आणले.

Six people have been poisoned after eating their legs | पेढे खाल्ल्याने सहा जणांना विषबाधा

पेढे खाल्ल्याने सहा जणांना विषबाधा

ठाणे : दहावीच्या परीक्षेत ५६ टक्के गुण मिळाल्याच्या आनंदात आणलेले पेढे खाल्ल्याने सहा जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. सर्वांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. उमेश गौतम यांनी दिली. दहावी उत्तीर्ण झालेल्या दुर्गानंद नंदकुमार सदगीर हिलाही उलट्या, जुलाबाच्या त्रास झाला.

नंदकुमार सदगीर यांची मुलगी दुर्गानंद दहावी उत्तीर्ण झाली म्हणून पेढे आणले. मात्र, ते खाल्ल्यानंतर गुरुनाथ सदगीर, सोमनाथ बिन्नर, योगेश बिन्नर, मयूर बिन्नर, कैलास बेनके, गणेश सदगीर यांना त्रास सुरू झाला.

Web Title: Six people have been poisoned after eating their legs